सगळी सोंगं जमतील पण पैशाचं नाही, याचं भान अजितदादांनी ठेवलं, ते कौतुकास पात्र; सामनातून ‘मिठे बोल’!

आजच्या सामना अग्रलेखातून अर्थमंत्री अजित पवार यांचं कौतुक करण्यात आलंय. | Ajit Pawar

सगळी सोंगं जमतील पण पैशाचं नाही, याचं भान अजितदादांनी ठेवलं, ते कौतुकास पात्र; सामनातून 'मिठे बोल'!
Sanjay Raut And Ajit pawar
Follow us
| Updated on: Mar 09, 2021 | 6:43 AM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पाचं आजच्या सामना अग्रलेखातून कौतुक करण्यात आलंय. महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर पुढे नेणारा हा अर्थसंकल्प आहे. महाराष्ट्राचे हित जोपासणारा आणि सर्वांना समाधानी करणारा हा अर्थसंकल्प आहे, असं सामनामध्ये म्हटलंय. (Shivsena Sanjay Raut Appriciate Ajit Pawar Over maharashtra Budget 2021 Through Saamana Editorial)

कोरोना असूनही रडगाणं नाही, सर्वांच्या हिताचा अर्थसंकल्प

अर्थसंकल्पावर टीका करणे हे विरोधकांचे पारंपरिक काम आहे. त्यामुळे ते कितीही आगपाखड करत असले, तरी अर्थसंकल्पातील एकंदर तरतुदी पाहता राज्यातील महत्त्वाच्या घटकांना काही ना काही देण्याचाच प्रयत्न अर्थसंकल्पात जागोजागी दिसतो. जनतेच्या खिशातून नव्याने काही काढण्याचा कुठेही प्रयत्न दिसत नाही. या अर्थाने हा अर्थसंकल्प घेणारा नव्हे तर देणारा आहे. कोरोनामुळे अभूतपूर्व आव्हाने येऊनही रडगाणे न गाता सर्व घटकांना दिलासा देणारा आणि महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर पुढे नेणारा हा अर्थसंकल्प आहे. महाराष्ट्राचे हित जोपासणारा आणि सर्वांना समाधानी करणारा हा अर्थसंकल्प आहे.

सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचं नाही, याचं भान अर्थमंत्र्यांनी ठेवलं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी विधानसभेत सादर केला. सगळी सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही, याचे पुरेपूर भान ठेवत अर्थमंत्र्यांनी राज्यातील सर्व विभागांचा, विविध क्षेत्रांचा आणि घटकांचा साकल्याने विचार करून एक सर्वसमावेशक आणि समतोल म्हणावा असा अर्थसंकल्प सादर केला.

अर्थमंत्री अजित पवार कौतुकास पात्र

एकीकडे सव्वा वर्षापासून घोंगावत असलेले कोरोनाचे वैश्विक संकट, लॉक डाऊनमुळे बाजारपेठा, व्यापार-उद्योग आणि एकूणच अर्थव्यवस्थेचा झालेला कोंडमारा त्यातून राज्याच्या महसुलात झालेली घट व तिजोरीला बसलेला फटका आणि जीएसटी व केंद्रीय करांचा हजारो कोटींचा केंद्रीय सरकारकडे थकलेला परतावा अशा चौफेर संकटांचे आव्हान असताना अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळणे हे तसे जिकिरीचेच काम होते. मात्र, तारेवरची ही कसरत लीलया पूर्ण करत अर्थमंत्री अजित पवारांनी महाविकास आघाडी सरकारचा विकासाला चालना देणारा जो दुसरा अर्थसंकल्प मांडला, त्याबद्दल ते नक्कीच प्रशंसेस पात्र आहेत.

हा अर्थसंकल्प घेणारा नव्हे तर देणारा, टीका करणं विरोधकांचं काम

मद्यावरील तेवढी एक छोटी करवाढ वगळता इतर कुठलीही मोठी करवाढ न करता राज्यातील शहरी व ग्रामीण जनतेला संपूर्ण न्याय देण्याचा या अर्थसंकल्पात कसोशीने प्रयत्न करण्यात आला आहे. अर्थसंकल्पावर टीका करणे हे विरोधकांचे पारंपरिक काम आहे. त्यामुळे ते कितीही आगपाखड करत असले, तरी अर्थसंकल्पातील एकंदर तरतुदी पाहता राज्यातील महत्त्वाच्या घटकांना काही ना काही देण्याचाच प्रयत्न अर्थसंकल्पात जागोजागी दिसतो. जनतेच्या खिशातून नव्याने काही काढण्याचा कुठेही प्रयत्न दिसत नाही. या अर्थाने हा अर्थसंकल्प घेणारा नव्हे तर देणारा आहे.

…म्हणून शेती आणि शेतकऱ्यांसाठी जास्त तरतूद

महाराष्ट्राचा लौकिक उद्योगप्रधान राज्य असा असला, तरी कोरोनाच्या संकटात शेती आणि कृषिपूरक उद्योगांनीच राज्याच्या अर्थव्यवस्थेला उभारी दिली, असे अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी मांडलेल्या आर्थिक पाहणी अहवालात नमूद केले होतेच. उद्योग व इतर क्षेत्रांची आर्थिक वाढ उणे होत असताना महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राने मात्र प्रगतीचा 11.7 टक्के इतका विक्रमी वेग नोंदविला. त्याचे प्रतिबिंब अर्थसंकल्पात उमटणे साहजिकच होते. कोरोनामध्ये राज्याला तारणाऱ्या शेती आणि शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात भरघोस तरतूद करण्यात आली ती यासाठीच.

हे सरकार आपलं, ही भावना रुजवण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न

बळीराजासाठी तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजाने, विकेल ते पिकेल या योजनेसाठी 2100 कोटी रुपये, 42 हजार कोटींचे पीक कर्ज देण्याचे उद्दिष्ट, कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी दोन हजार कोटींची तरतूद, कृषिपंपांच्या सौरऊर्जा जोडणीसाठी महावितरणला पंधराशे कोटींचा निधी, राज्यातील चार कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी दोनशे कोटी रुपये, थकित वीज बिलांमध्ये 33 टक्क्यांची सूट असे एक ना अनेक शेतकरी हिताचे निर्णय अर्थसंकल्पात ठळकपणे दिसतात. हे आपले सरकार आहे, ही भावना शेतकऱ्यांच्या मनात रुजविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्या दिवसापासूनच प्रयत्न करत आहेत.

अर्थसंकल्पात काय काय…?

कोरोनाच्या संकटकाळात सर्वाधिक ताण आरोग्य यंत्रणेवर. आरोग्य यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी 7 हजार 500 कोटी रुपयांची तरतूद नागरी, आरोग्य संचालनालयाबरोबरच कोरोनासारख्या संसर्गजन्य आजारासाठी राज्यात नवीन जिल्हा रुग्णालय, मनपा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी होणार उस्मानाबाद, परभणी, सिंधुदुर्ग आणि अमरावतीमध्ये वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठीही भरीव तरतूद शिवडी-न्हावाशेवा प्रकल्प 2022 ला पूर्ण करण्याची घोषणा वरळी-शिवडी पुलाचे काम 3 वर्षांत पूर्ण करण्याचा संकल्प मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि वसई ते कल्याण जलमार्ग सुरू करण्याची घोषणा, मुंबईतील रेल्वे रुळांवर 7 उड्डाणपूल पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ राज्याच्या ग्रामीण भागात दहा हजार कि.मी. रस्त्यांची कामे विदर्भातील गोसे खुर्द सिंचन प्रकल्पासाठी एक हजार कोटी रुपयांची मंजुरी बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा 500 किलोमीटरचा पहिल्या टप्प्यातील रस्ता 1 मेपासून वाहतुकीसाठी खुला करण्याची घोषणा नांदेड ते जालनादरम्यान 200 किलोमीटरच्या नवीन महामार्गाची उभारणी आठ प्राचीन मंदिरांसाठी 101 कोटी रुपयांचा निधी लोणार सरोवर, महाबळेश्वर व पाचगणीच्या विकासाचा आराखडा जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अर्थमंत्र्यांनी तुकडी स्थापना

(Shivsena Sanjay Raut Appriciate Ajit Pawar Over maharashtra Budget 2021 Through Saamana Editorial)

हे ही वाचा :

ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसमध्ये असते तर मुख्यमंत्री बनले असते, आता भाजपात बॅक बेंचर – राहुल गांधी

मोठी बातमी : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता, शिवसेना आमदारांना व्हिप जारी

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.