नितीन गडकरींना विरोधी पक्षाकडून पंतप्रधानपदाची ऑफर, संजय राऊत म्हणाले “स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर…”

जर विरोधी पक्षातील एखाद्या प्रमुख नेत्याने त्यांच्यापुढे कोणी मांडली असेल, तर त्यात मला काहीही चुकीचं वाटत नाही, असे संजय राऊत म्हणाले.

नितीन गडकरींना विरोधी पक्षाकडून पंतप्रधानपदाची ऑफर, संजय राऊत म्हणाले स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर...
Follow us
| Updated on: Sep 17, 2024 | 3:57 PM

Sanjay Raut On Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतंच एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने मला पंतप्रधानपदाची ऑफर दिली होती, पण पक्ष आणि विचारधारेसाठी मी तो प्रस्ताव नाकारला, असा खुलासा नितीन गडकरींनी केला. त्यावरुन आता राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. आता यावर विविध नेते प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. नुकतंच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नितीन गडकरी यांच्या विधानवर भाष्य केले आहे.

संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना नितीन गडकरींनी पंतप्रधान पदावरुन केलेल्या विधानावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संजय राऊतांनी स्पष्टपणे भूमिका मांडली. कोणी विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी ज्या नेत्याला ते फार मानतात त्यांना जर हा सल्ला कोणी दिला असेल, मला यात काहीही चुकीचं वाटत नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली.

संजय राऊतांची प्रतिक्रिया काय?

नितीन गडकरी हे भाजपमधील सर्वसामान्य असे नेते आहेत. पंतप्रधान पदासाठी तडजोड करा असं त्यांना कोणी सांगितलं असेल असं मला वाटत नाही. मुळात या देशात ज्या पद्धतीची हुकुमशाही किंवा एकाधिकारशाही सुरु आहे. गेल्या दहा वर्षांपासून आणीबाणी लावण्याचा प्रयत्न सुरु आहे, त्याच्याशी तडजोड करु नका, त्या प्रवृत्तीशी तडजोड करु नका, ही भूमिका जर विरोधी पक्षातील एखाद्या प्रमुख नेत्याने त्यांच्यापुढे कोणी मांडली असेल, तर त्यात मला काहीही चुकीचं वाटत नाही, असे संजय राऊत म्हणाले.

किंबहुना आज जे सरकारमध्ये बसून या देशातील मुल्यांशी तडजोड करत आहेत, यात लोकशाही, स्वातंत्र्य न्याय व्यवस्था, पालिका तो एक अपराध आहे असं मी मानतो. नितीन गडकरी हे सातत्याने त्याबद्दल बोलत राहिले, त्यांनी याविरुद्ध आवाज उठवला, त्यांच्या भूमिका मांडल्या. त्यामुळे जर त्यांना कोणी विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी ज्या नेत्याला ते फार मानतात त्यांना जर हा सल्ला कोणी दिला असेल, तर त्यात कोणालाही फार त्रास होण्याचे कारण नाही, असेही संजय राऊतांनी म्हटले.

जगजीवन राम यांनी १९७७ साली काँग्रेस पक्षातून याच मुद्द्यासाठी बंड केले होते आणि इंदिरा गांधी यांचा पराभव झाला होता. जर देशात न्यायपालिकेचे स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर काही जणांना सत्तेचा त्याग करावा लागतो आणि तो त्याग केला की देशाला स्वातंत्र्य मिळालं, असेही संजय राऊत म्हणाले.

नितीन गडकरी काय म्हणाले?

दरम्यान नितीन गडकरी यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना मला पंतप्रधान पदाची ऑफर होती असा धक्कादायक खुलासा केला. काही दिवसांपूर्वी एक घटना घडली. या घटनेतील नेत्याचे नाव मी तुम्हाला सांगणार नाही. पण त्याने मला सांगितले होते की, तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. त्यावर मी त्यांना विचारलं की तुम्ही मला पंतप्रधान पदासाठी का पाठिंबा देणार आणि तो पाठिंबा मी का घ्यावा? मी त्या नेत्याला स्पष्टपणे सांगितलं की, पंतप्रधानपद हे माझ्या आयुष्यातील ध्येय नाही. मी माझ्या तत्वांशी आणि पक्षसंघटनेशी एकनिष्ठ आहे. मी पंतप्रधानपदासाठी तत्त्वांशी आणि पक्षाशी प्रतारणा करणार नाही. ही तत्त्वं हीच भारतीय लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे, असा किस्सा नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितला.

‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.
'राहुल गांधींची जीभ छाटू नये, जिभेला चटके..',भाजप खासदाराची जीभ घसरली
'राहुल गांधींची जीभ छाटू नये, जिभेला चटके..',भाजप खासदाराची जीभ घसरली.
बहिणींनंतर आता भाऊही लाडके... अजितदादांच्या 'त्या' जाहिरातीची एकच चर्च
बहिणींनंतर आता भाऊही लाडके... अजितदादांच्या 'त्या' जाहिरातीची एकच चर्च.
महायुती-मविआत चर्चा सुरू, जागांवरून रस्सीखेच, कोण-कुठे मोठा भाऊ?
महायुती-मविआत चर्चा सुरू, जागांवरून रस्सीखेच, कोण-कुठे मोठा भाऊ?.
गुडघे टेकायला लावणार की आयुष्यात पश्चाताप..,जरांगेंचा फडणवीसांना इशारा
गुडघे टेकायला लावणार की आयुष्यात पश्चाताप..,जरांगेंचा फडणवीसांना इशारा.
लालबाग राजाला २५ तासानंतर जड अंतःकरणाने निरोप, गिरगाव चौपाटीवर विसर्जन
लालबाग राजाला २५ तासानंतर जड अंतःकरणाने निरोप, गिरगाव चौपाटीवर विसर्जन.