युती झाली नाही तर 288 जागांवर लढण्याची तयारी ठेवा, उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांना आवाहन
"यंदाच्या विधानसभेत युती झाली नाही तर 288 जागांवर लढण्याची (Shivsena BJP Alliance) तयारी ठेवा" अशी सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिल्या आहेत.
मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना-भाजप युतीत (Shivsena BJP Alliance) मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. “यंदाच्या विधानसभेत युती झाली नाही तर 288 जागांवर लढण्याची (Shivsena BJP Alliance) तयारी ठेवा” अशी सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिल्या आहेत. उद्धव ठाकरेंच्या या सूचनेमुळे शिवसेना यंदाच्या निवडणुकीत स्वबळावर लढणार असल्याच्या चर्चांना पेव फुटलं आहे.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी मातोश्रीवर बैठकांचे सत्र सुरु आहे. आज मातोश्रीवर झालेल्या मुंबईतील विभागवार बैठकांमध्ये उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांशी (Shivsena BJP Alliance) संवाद साधला.
लोकसभेप्रमाणे विधानसभेतही भाजप शिवसेनेची युती होईल असं चित्र सध्या तरी दिसत आहे. मात्र यंदा गाफील राहून चालणार नाही. त्यामुळे 288 जागांवर लढण्याची तयारी ठेवा आणि त्यानुसार तयारीला लागा असा आदेश उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिला आहे.
येत्या विधानसभेत शिवसेना-भाजप युतीत लढण्यासाठी पक्षाचे आमदार आग्रही आणि आशावादी आहे. पण जर युती झाली नाही तर शिवसैनिकांची कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्याची तयारी असली पाहिजे असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
अमित शाहांच्या उपस्थितीत 19 सप्टेंबरला शिवसेना-भाजप युतीची घोषणा?
दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीची घोषणा (Prasad Lad Shivsena BJP Alliance) 19 सप्टेंबरला होणार असल्याचे संकेत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी दिले आहेत. नाशिकमध्ये अमित शाहांच्या उपस्थितीत सेना-भाजप एकत्र निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब (Prasad Lad Shivsena BJP Alliance) होण्याची शक्यता आहे.