राम मंदिर आंदोलनातील राजकीय घुसखोर कोण आहेत ते कळू द्या; शेलारांची शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका

या पुस्तकात काही लोकांचा उल्लेख केलाय. काही लोकांचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळण्यात आला आहे. | Ashish Shelar

राम मंदिर आंदोलनातील राजकीय घुसखोर कोण आहेत ते कळू द्या; शेलारांची शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका
Follow us
| Updated on: Dec 22, 2020 | 10:11 PM

मुंबई: भाजप आमदार आशिष शेलार यांनी राम मंदिर आंदोलनावरुन शिवसेनेला डिवचले आहे. या आंदोलनात (Ram Mandir Andolan) शिवसेनेने राजकीय घुसखोरी केली होती, असा गंभीर आरोप आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला. भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी (Madhav Bhandari) यांच्या ‘अयोध्या’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मंगळवारी मुंबईत पार पडला. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष मंगलप्रभात लोढा हे नेते उपस्थित होते. (BJP leader Ashish Shelar take a dig at Shivsena over Ram Mandir Andolan)

या कार्यक्रमाच्या मंचावरुन आशिष शेलार यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली. त्यांनी माधव भंडारी यांच्या पुस्तकाचा संदर्भ देताना म्हटले की, या पुस्तकात काही लोकांचा उल्लेख केलाय. काही लोकांचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळण्यात आला आहे. हे दोन्ही संदर्भ अगदी खरे आहेत. एखाद्या आंदोलनात राजकीय घुसखोरी करणारे आम्ही पहिल्यांदाच पाहत आहोत. राममंदिर आंदोलनाच्यानिमित्ताने झालेल्या राजकीय घुसखोरीवर तुम्ही नक्की लिहले पाहिजे, असे आशिष शेलार यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस त्या पुस्तकाचं टायमिंग योग्यरित्या साधतील, असेही शेलार यांनी सांगितले.

शिवसेना आणि भाजप यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शुद्ध भगवा आणि हिंदुत्वाचा रंगलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांचे हे वक्तव्य शिवसेनेला लक्ष्य करणारे असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता यावर शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘कोणाच्या पोटात कितीही दुखलं तरी चालेत, पण 2024 मध्ये तुम्हाला रामाचं दर्शन मिळणार’

राम मंदिराची उभारणी कोणी करायची, हा प्रश्न काही लोक उपस्थित करत आहेत. मंदिर बांधण्यासाठी सरकारची आवश्यकता नाही. या मंदिराच्या निर्माणात लोकसहभाग महत्त्वाचा आहे. देशाला ज्या प्रभू श्रीरामाने एकत्र आणले, त्याचं मंदिर सगळे मिळून बांधतील. कोणाच्या पोटात कितीही दुखलं तरी चालेत, पण 2024 मध्ये तुम्हाला रामाचं दर्शन मिळेल, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून गोळा केल्या जाणाऱ्या राममंदिराच्या वर्गणीच्या मुद्द्यावरुन ज्यांच्या पोटात दुखत आहे, त्यांनीही वाटल्यास पैसे द्यावेत. त्यांनी पैसे गोळा केले तरी चालतील. याची त्यांना रितसर पावती दिली जाईल, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लगावला.

अयोध्या भूमी कमी होती का? जिथे रामलल्ला विराजमान होते तीच जागा का दिसली?

खरंतर रामजन्मभूमीचं आंदोलन गेले अनेक शतकं सुरु होतं. 1528 साली बाबराचा सेनापती मीर बाकी याने अयोध्येचं राम मंदिर तोडून मशिद बांधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सातत्याने हे आंदोलन सुरु राहिलं. ज्या लोकांना वाटतं हा केवळ मंदिर आणि मशिदीचा वाद आहे, त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की, अयोध्या भूमी कमी होती का? मशिद बांधण्यासाठी दुसरी जागा नव्हती का? हा केवळ जमिनीचा वाद नाही. एखाद्या समाजाला पराजित मानसिकतेत नेण्यासाठी त्याचा आत्मा मारावा लागतो म्हणूनच फक्त मंदीर पाडून मज्जिद बांधायच होतं, असेही फडणवीस यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे?, वनवास संपला तरी श्रीरामाची अडवणूक सुरुच, शिवसेनेचा निशाणा

संजय राऊतांची भूमिका राम मंदिर विरोधी, आशिष शेलारांचा हल्लाबोल

(BJP leader Ashish Shelar take a dig at Shivsena over Ram Mandir Andolan)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.