“अरे तेवढ्या कुवतीचा तू नाहीये…”, उद्धव ठाकरे यांचा फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला

मी परवा शिवसैनिकांसमोर मी बोललो. एक तर तू राहशील किंवा मी राहील., माझ्यापायाशी कलिंगड ठेवलं. काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं. पण मी ढेकणांना आव्हान देत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

अरे तेवढ्या कुवतीचा तू नाहीये..., उद्धव ठाकरे यांचा फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला
Follow us
| Updated on: Aug 03, 2024 | 2:15 PM

Uddhav Thackeray On Devendra Fadanvis : येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यादरम्यान ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषण केले. या भाषणावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही टीका केली.

“बऱ्याच वर्षानंतर मी पुण्यात तुमच्यासमोर येतोय. आज मला जाहीर सभा घ्यायची होती. आता लढाई मैदानात होणार. हॉलमध्ये होणार नाही. मी परवा शिवसैनिकांसमोर मी बोललो. एक तर तू राहशील किंवा मी राहील., माझ्यापायाशी कलिंगड ठेवलं. काही जणांना वाटलं मी त्यांना आव्हान दिलं. पण मी ढेकणांना आव्हान देत नाही. मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण. मी म्हणजे संस्कारीत महाराष्ट्र आणि तू म्हणजे महाराष्ट्रावर दरोडे टाकणारा पक्ष”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“मी ढेकणाला आव्हान देत नाही”

“मी ढेकणाला आव्हान देत नाही. ढेकणाला बोटानं चिरडलं जातं. ते म्हणाले, माझ्या नादाला लागू नका. अरे तुझ्या नादाला लागण्याएवढ्या कुवतीचा तू नाहीच आहेस”, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

“त्यांनी नद्यांची नावे बदलायला सांगितली”

“पर्यावरण हा विषय पुणेकरांचा आहे. विकासाचं स्वप्न दाखवलं जातं. जॉगिंग ट्रॅक होईल अमूक होईल. ते ठिक आहे. पण त्यामुळे शहराची काय हानी होणार आहे ते सांगा. सध्या अनेक ठिकाणी पूर येत आहे. त्याला निसर्ग जबाबदार आहे. पण आपणही आहोत. मुंबईत मेट्रोच्या कामामुळे पाणी साचत आहे. मुंबईकरांना गटाराचं पाणी येत आहे. त्यामुळे पोटाचे विकार होत आहे. पुण्यात मुळा मुठा नदी आहे. त्याबाबत व्यंकय्या नायडू आले होते. त्यांनी मुळा मुठा हे काय नाव आहे. व्यंकय्या नाव ठेवायचं का की मोदी नदी म्हणायचं. त्यांनी नद्यांची नावे बदलायला सांगितली. नावं तर बदलू शकत नाही. पण त्यांनी प्रवाह बदलला”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

“हा विकास नाही, विखार आहे”

पुण्यात नाईक बेट आहे. या नाईक बेटाचे दोन्ही बाजूने प्रवाह बंद केला. प्रवाह बंद करून घरे बांधली. मग नदी का घुसणार नाही इकडे तिकडे. मला पुण्याचा शाश्वत विकास करायचा आहे. मी पुण्याच्या कामाची दखल घेतली नव्हती. कारण पुण्यात काही सुभेदार बसले होते. आपली सत्ता असताना काही ठिकाणी आपण पुण्यात स्टे दिला होता. यांनी तो स्टे काढला. त्यांनी नदीच्या जागेवर कामं सुरू केली. हा विकास म्हणायचा. हा विकास नाही. विखार आहे. म्हणूनच आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे. त्यासाठी तू राहशील किंवा मी राहील. तू विकासाच्या नावाखाली वाट लावली. त्यामुळेच आम्ही बोलत आहोत, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.