‘सत्यमेव जयते’चे ‘सत्ता’मेव जयते होऊ देऊ नका : उद्धव ठाकरे
सत्यमेव जयतेचे सत्तामेव जयते होऊ देऊ नका, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav thackeray criticized on bjp) यांनी ग्रँड हयातमध्ये महाविकासआघाडीच्या आमदारांना सांगितले.
मुंबई : “सत्यमेव जयतेचे ‘सत्ता’मेव जयते होऊ देऊ नका,” असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav thackeray criticized on bjp) यांनी ग्रँड हयातमध्ये महाविकासआघाडीच्या आमदारांना सांगितले. आज (25 नोव्हेंबर) ग्रँड हयात हॉटेलमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी तिन्ही पक्षाचे दिग्गज नेतेही (Uddhav thackeray criticized on bjp) उपस्थित होते.
“आपलं जे वाक्य आहे. सत्यमेव जयते हे सत्यमेव जयतेच असले पाहिजे, सत्तामेव जयते आपण होऊ देऊ शकत नाही”, असं उद्धवा ठाकरेंनी यावेळी सांगितले.
“मुख्यमंत्र्यांच्या मी पुन्हा येईन, या वाक्याचीही उद्धव ठाकरेंनी खिल्ली उडवली. मी असं नाही म्हणत की मी पुन्हा येईन, आम्ही आलेले आहोत”, असं उद्धवा ठाकरे (Uddhav thackeray criticized on bjp) म्हणाले.
“एक मात्र बरं झालं की जो काही केविलवाणा प्रयत्न झाला हातपाय मारण्याचा, मी तर म्हणतो अजून करा. कारण जेवढे तुम्ही प्रयत्न कराल आम्हाला अडविण्यासाठी तेवढे आम्ही अधिक घट्टपणाने उभे राहू,” असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले.
“ही ताकद, ही शक्ती आपण अशीच जपूया”, असा सल्लाही ठाकरेंनी महाविकासआघाडीच्या आमदारांना (Uddhav thackeray criticized on bjp) दिला.
दरम्यान, महाविकासआघाडीच्या आमदारांनी एकत्र येत ग्रँड हयात हॉटेलमध्ये शक्तीप्रदर्शन केले. यावेळी तिन्ही पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित होते. त्यासोबतच या सर्व आमदारांनी एक निष्ठतेची शपथही घेतली. लवकरच राज्यात महाविकासआघाडीचे सरकार येईल, असा विश्वासही यावेळी सर्व आमदारांनी व्यक्त केला.
सांताक्रुझच्या ग्रँड हयात हॉटेलच्या तळमजल्यावरील बॉल रुममध्ये हे फोटो सेशन पार पडलं. यावेळी ओळख परेडही झाले. संध्याकाळी 7 च्या दरम्यान ही ओळख परेड पार पडली. याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी “आम्ही सर्व एक आहोत आणि एकत्र आहोत. आमच्या 162 आमदारांना या आणि एकत्र बघा,” असे ट्विट केले होते. विशेष म्हणजे संजय राऊत यांनी हे ट्विट राज्यपालांना टॅग केले आहे.
शिवसेना नेते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे ग्रँड हयातमध्ये उपस्थित होते. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सुप्रिया सुळे ग्रँड हयातमध्ये उपस्थित होते. त्याशिवाय काँग्रेस नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, मल्लिकाअर्जुन खर्गे हयातमध्ये उपस्थित होते.
संबंधित बातम्या :
फोटो तुमचा, फोटोग्राफर तुमचा, पण फोटोफ्रेमचा एन्ड भाजप करेल : आशिष शेलार
माझ्या निष्ठेवर प्रश्न नको, ‘त्या’दिवशी मी दुपारी एकपर्यंत झोपलो होतो : धनंजय मुंडे
अजित पवारांच्या धमकीला घाबरु नका, तुमची जबाबदारी माझ्यावर : शरद पवार