‘ठाकरे’ सरकारचा फडणवीसांना आणखी एक दणका, पालिका क्षेत्रातील कामांना स्थगिती

नुकतंच ठाकरे सरकारने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अजून एक दणका दिला आहे. पालिका क्षेत्रात फडणवीस सरकारच्या काळात कामांना स्थगिती देण्यात आली (CM uddhav thackeray stay order) आहे.

'ठाकरे' सरकारचा फडणवीसांना आणखी एक दणका, पालिका क्षेत्रातील कामांना स्थगिती
Follow us
| Updated on: Dec 05, 2019 | 10:55 PM

मुंबई : राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जोमानेच कामाला लागले (CM uddhav thackeray stay order) आहेत. नुकतंच ठाकरे सरकारने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अजून एक दणका दिला आहे. पालिका क्षेत्रात फडणवीस सरकारच्या काळात कामांना स्थगिती देण्यात आली (CM uddhav thackeray stay order) आहे. ज्या कामांचा शुभारंभ झाला नसेल अशा कामांना स्थगिती देण्याचा निर्णय नगरविकास खात्याने घेतला आहे. यामुळे फडणवीसांना चांगलाच दणका मिळाल्याचे बोललं जात (CM uddhav thackeray stay order) आहे.

नगरविकास खात्याने घेतलेल्या निर्णयानुसार, राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत यांना विकास कामांकरिता विविध योजनेंतर्गत विशेष अनुदान देण्यात येते. यात महापालिका पायाभूत सुविधा, महापालिका हद्दवाढ, नवीन नगरपालिका, नगरपालिका हद्दवाढ, नगरपरिषद यात्रास्थळ , नगरपरिषद वैशिष्ट्यपूर्ण यांसह इतर योजनेतंर्गत 2019-20 आर्थिक वर्षात निधी वितरीत करण्यात आला आहे.

मात्र उपरोक्त योजनांमध्ये शासनाने वितरीत केलेल्या निधीपैकी ज्या कामांचे कार्यारंभ आदेश अद्याप देण्यात आलेले नाहीत अशी सर्व कामे पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात यावी असा निर्णय नगरविकास खात्याने जाहीर केला (CM uddhav thackeray stay order) आहे.

तसेच नगरोत्थान प्रकल्पांच्याबाबतीत अद्याप कार्यारंभ आदेश देण्यात आले नसतील, अशा कोणत्याही प्रकल्पाचे कार्यारंभ पुढील आदेशापर्यंत देण्यात येऊ नये. असेही यात नमूद करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे ज्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे अशा कामांची शासन निर्णय निहाय यादी उद्यापर्यंत शासनाला पाठवावी. दरम्यान ज्या कामांची यादी उद्यापर्यंत प्राप्त होणार नाहीत, त्याना कार्यारंभाचा आदेश दिलेला नाही असे ग्राह्य धरण्यात येईल असेही यात म्हटलं (CM uddhav thackeray stay order) आहे.

दरम्यान हा निर्णयाचा सर्वाधिक फटका भाजपला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण राज्यात बहुतांश पालिका या भाजपच्या ताब्यात आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारने देवेंद्र फडणवीस यांना चांगलाच दणका दिल्याचीही चर्चा रंगू लागली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.