नितेश राणेंचा कणकवलीत पराभव करुन शिवसेना काय आहे, हे दाखवून देऊ; वैभव नाईक गरजले
भाजप नेते आमदार नितेश राणेंचा (Nitesh Rane) कणकवलीत पराभव करून शिवसेना (Shivsena) काय चीज आहे हे दाखवून देऊ, अशी गर्जना शिवसेना आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी केली आहे.

सिंधुदुर्ग : भाजप नेते आमदार नितेश राणेंचा (Nitesh Rane) कणकवलीत पराभव करून शिवसेना (Shivsena) काय चीज आहे हे दाखवून देऊ, अशी गर्जना शिवसेना आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदावर (Sindhudurg ZP President Election) भाजपचा अध्यक्ष आरुढ झाल्यावर नितेश राणे यांनी वैभव नाईक यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यांच्या टीकेला वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (Shivsena Vaibhav naik Accepted Challenge BJP Nitesh Rane)
वैभव नाईक हे आमच्याशी आयुष्यात कधीच स्पर्धा करू शकत नाहीत. सिंधुदुर्गात राणेंना आव्हान देणारा किंवा धक्का देणा-याला दहा जन्म घ्यावे लागतील असं आव्हान नितेश राणे यांनी शिवसेनेला दिलं होतं. त्यांचं आव्हान स्वीकारत नितेश राणेंचा कणकवलीत पराभव करुन शिवसेना काय आहे, हे दाखवून देऊ, असा निर्धार आमदार वैभव नाईक यांनी केलाय.
काय म्हणाले वैभव नाईक?
नितेश राणेंचा कणकवलीत पराभव करुन शिवसेना काय आहे, हे दाखवून देऊ. नारायण राणेंचं आव्हान आम्ही कधीच संपवलं. वैभव नाईक एक व्यक्ती म्हणून नाही तर सामान्य शिवसैनिक म्हणून राणेंना आव्हान देऊन 2014 च्या निवडणुकीत राणेंसारख्या माजी मुख्यमंत्र्याचा पराभव केला तर गेल्या निवडणूकीत माझ्या मुळेच नारायण राणेंनी पळ काढला, अशी जोरदार टीका वैभव नाईक यांनी राणेंवर केली.
नितेश राणे काय म्हणाले होते?
सिंधुदुर्ग जिल्हा राणे साहेबांच्या पाठीमागे खंबीर उभा असून आम्हाला आव्हान देणारा धक्का देणा-याला दहा जन्म घ्यावे लागतील, असा थेट इशारा नितेश राणे यांनी शिवसेनेला दिला होता. तसंच जिल्ह्यामधे वैभव नाईक हे आम्हाला आयुष्यात कधीच स्पर्धा करू शकत नाहीत आणि हे पुन्हा एकदा सिद्ध झालयं अशी टीका करत नितेश राणे यांनी वैभव नाईक यांना आव्हान दिलं होतं.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भाजपचा अध्यक्ष
जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपनं बाजी मारली आहे. भाजपच्या संजना सांवत यांची अध्यक्षपदावर निवड झाली आहे. संजना सावंत यांनी शिवसेनेच्या उमेदवार वर्षा कुडाळकर यांचा 30 विरुद्ध 19 अशा फरकाने पराभव केला आहे. भाजपचा एक सदस्य अनुपस्थित राहिला. भाजपच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
(Shivsena Vaibhav naik Accepted Challenge BJP Nitesh Rane)
हे ही वाचा :
सिंधुदुर्ग जिल्हा परिषेदेवर भाजपचाच अध्यक्ष, आमदार नितेश राणेंसह कार्यकर्त्यांचा जल्लोष
सिंधुदुर्ग ZP अध्यक्षपदासाठी राणेंकडून याचना, शपथा, आमिषं आणि धमक्या, वैभव नाईकांचा आरोप
सिंधुदुर्ग ZP : भाजपचे 31, शिवसेनेचे 19; तरी राणेंना धक्का देत शिवसेनेचा अध्यक्ष बसणार?