“एकनाथ शिंदे अज्ञानी, त्यांनी अभ्यास करावा!”, विनायक राऊतांचा सल्ला
:शिवसेना नेते विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. पाहा...
गिरीश गायकवाड, प्रतिनिधी, मुंबई : शिवसेना नेते विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका केली आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हासंदर्भात आज निर्णय येण्याची शक्यता आहे. त्यावर राऊतांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी शिंदेंवर टीका केलीय. मुख्यमंत्री अज्ञानी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जे सत्य आहे ते निवडणुक आयोगात मांडू, असं राऊत (Vinayak Raut) म्हणालेत.
आज दुपारी 2 वाजेपर्यंत सगळे पुरावे आम्ही निवडणूक आयोगासमोर ठेवणार आहोत. शिंदे गटाचे सगळे पुरावे तकलादू आहे. बोगस सदस्य नोंदणी आहे. 10 लाख सदस्य नोंदणी केलीय. त्यांची चौकशी व्हावी. मुख्यमंत्री अज्ञानात आहेत. त्यांना अभ्यास करावा लागेल, असं राऊत म्हणालेत.
नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केली. त्याबाबत राऊतांना विचारलं असता नारायण राणेंसारख्या तकलादू, स्वार्थी नेत्याबद्दल बोलायचं नाही.ते लाचार आहेत,मी त्यांना काहीही किंमत देत नाही, असं विनायक राऊत म्हणालेत.
राणे दिवसा बोललात की रात्री ते चेक करायला हवं. लाचारीत माझी गणती करू नका. माझं रक्त तुमच्यासारख्या बाडग्यात येणार नाही, असं राऊत म्हणालेत.
धनुष्यबाण चिन्हासाठी ठाकरे विरूद्ध शिंदे अशी लढाई निवडणूक आयोगासमोर होत आहे. निवडणूक आयोगाचे ठाकरे आणि शिंदे गटाला मध्यरात्री ईमेल केला. आज दुपारी दोन वाजेपर्यंत दावे सादर करण्याचे निर्देश दिले. आजचीच डेडलाईन का?, असा सवाल शिवसेनेच्या वकिलांनी पत्राद्वारे निवडणूक आयोगाला केला आहे.यावर बोलताना निवडणूक आयोग कुणाच्या दबावाखाली काम करतंय, असं विनायक राऊत म्हणालेत.