पारशिवनीत सत्ताधारी शिवसेना-भाजप वाद टोकाला, कामात अनियमितता, चौकशी करा, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
पारशिवनी नगरपंचायतीमध्ये सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमधला वाद टोकाला गेला आहे.

नागपूर : पारशिवनी नगरपंचायतीमध्ये सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमधला वाद काही नवीन नाही. मात्र, आता सत्ताधारी आणि भाजपमधील वाद टोकाला गेला आहे. भाजपच्या नगरसेवकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे सत्ताधाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली. सत्ताधाऱ्यांमुळे नगरसेवकांची कामं होत नसल्याचा आरोप त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केला आहे. भाजप नगरसेवकांनी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. भाजपचे माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांच्या नेतृत्त्वात भाजपच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले (Shivsena Vs BJP In Parshivani).
‘गेल्या दोन वर्षांत पारशिवनीत झालेले कामं आणि अनियमिततेची चौकशी व्हावी’, अशी मागणी यावेळी भाजपचे माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांनी केली.
नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी नगर पंतायतीमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. तर त्यापाठोपाठ भाजपचे 11 नगरसेवक आहे. गेल्या काही दिवसांपासून इथे सत्ताधारी शिवसेना आणि भाजप यांचा वाद टोकाला गेला. यातूनच कामं होत नसल्याने भाजप नगरसेवकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडेच तक्रार केली आहे.
पारशिवनीत कोणाचं वर्चस्व?
रामटेक विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाचं शहर म्हणजे पारशिवनी. रामटेकमध्ये 2014 च्या निवडणूकीत भाजपचे आमदार निवडूण आले होते. पण 2019 ला शिवसेना बंडखोर आशिष जैसवाल निवडणूक आले आणि विजयानंतर ते शिवसेनेसोबत गेले. त्यानंतर या मतदारसंघात भाजप-शिवसेना वादाची खरी सुरुवात झाली.
पारशिवनी नगरपंचायतीच्या निमित्ताने हा वाद आता जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला. शिवसेनेच्या नगराध्यक्षांची भाजपच्या नगरसेवकांनी तक्रार केली. अपवाद वगळता नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक छोट्या मोठ्या गावात, नगर पंतायतीत महाविकास आघाडीतील पक्ष आणि भाजपात संघर्ष पहायला मिळतो. पारशीवनीतला संघर्ष आता टोकाला गेला आहे.
काँग्रेस नेते आशिष देशमुख अमरावतीतून विधान परिषदेवर जाण्याची शक्यता#Congressleader #AshishDeshmukh #LegislativeCouncil #amravati https://t.co/BkfH1g9hTw
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 5, 2020
Shivsena Vs BJP In Parshivani
संबंधित बातम्या :
नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार जवळपास निश्चित, भाजपचं मात्र ठरता ठरेना!
विदर्भात थंडीचा कडाका, गेल्या 24 तासात तापमानात घसरण, रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद