Jayant Patil : मुक्ताईनगरकडे पाठ फिरताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश; जयंत पाटलांचा जळगाव दौरा चर्चेत
राष्ट्रवादीच्या (NCP) गोटात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. शनिवारी जयंत पाटील (Jayant Patil) हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. जयंत पाटील यांचा दौरा आटोपताच राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
जळगाव : राष्ट्रवादीच्या (NCP) गोटात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. शनिवारी जयंत पाटील (Jayant Patil) हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. दरम्यान यावेळी जयंत पाटलांनी मुक्ताईनगरला देखील भेट दिली. मात्र जयंत पाटलांच्या भेटीनंतर अवघ्या काही वेळातच राष्ट्रवादीच्या मुक्ताईनगरमधील (Muktainagar)अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे गटाचे मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मुक्ताईनगर तालुक्यातील सारोळा आणि रिगाव येथील कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. जयंत पाटील शनिवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुक्ताईनगरला देखील भेट दिली. मात्र जयंत पाटलांच्या भेटीनंतर अवघ्या काही वेळातच राष्ट्रवादीच्या सारोळा आणि रिगाव येथील अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे गटाचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
जयंत पाटलांचा भाजपावर निशाणा
राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराला तब्बल 40 दिवस लागले. यावरून विरोधकांकडून राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात आली होती. मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्रिपद न मिळाल्याने शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याच्या बातम्या सातत्याने येत आहेत. याबाबत जयंत पाटील यांना विचारले असता शिंदे गटातीलच नाही तर भाजपमधील देखील काही आमदार नाराज असल्याचे जंयत पाटील यांनी म्हटले आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून भाजप आणि शिंदे गटातील काही आमदारांमध्ये नाराजी आहे, त्यामुळे हे सरकार फार काळ टीकणार नाही असं सातत्याने विरोधकांकडून सांगण्यात येत आहे.
शिंदे गटात इनकमिंग सुरूच
काल मुक्ताईनगर तालुक्यातील अनेक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे गटाचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हे कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाले. विशेष म्हणजे मुक्ताईनगला काही वेळापूर्वीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भेट दिली होती. पाटलांचा दौरा अटोपताच कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यापूर्वी देखील शिवसेनेतील अनेक नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. तसेच महाविकास आघाडीमधील आणखी काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे.