भर पत्रकार परिषदेत भाजप नेत्यावर बूट फेकला
नवी दिल्ली : भाजप नेते जी. व्ही. एल. नरसिंह यांच्यावर भर पत्रकार परिषदेत बूट भिरकावल्याचा प्रकार घडला आहे. बूट फेकणाऱ्याचे नाव शक्ती भार्गव असे असून तो डॉक्टर असल्याचे समोर येत आहे. भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहराव दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. याचवेळी हा सर्व प्रकार घडला. आरोपीने बुट फेकल्यानंतर मंचाकडे जाण्याचाही प्रयत्न केला, मात्र भाजप […]
नवी दिल्ली : भाजप नेते जी. व्ही. एल. नरसिंह यांच्यावर भर पत्रकार परिषदेत बूट भिरकावल्याचा प्रकार घडला आहे. बूट फेकणाऱ्याचे नाव शक्ती भार्गव असे असून तो डॉक्टर असल्याचे समोर येत आहे. भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहराव दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते. याचवेळी हा सर्व प्रकार घडला.
आरोपीने बुट फेकल्यानंतर मंचाकडे जाण्याचाही प्रयत्न केला, मात्र भाजप कार्यकर्त्यांनी त्याला पकडले आणि बाहेर काढले. पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले असून तपास सुरु आहे. भाजपने ही व्यक्ती काँग्रेसपुरस्कृत असल्याचा आरोप केला. मात्र, काँग्रेसने या आरोपांचे खंडन करत भाजप या विषयात राजकारण करत असल्याचे म्हटले.
सरकारी मिलमध्ये 11 कामगारांनी आत्महत्या केल्याने त्या रागातून बूट फेकून मारल्याचे म्हटले जात आहे. आरोपी भार्गवच्या फेसबूक वॉलवर त्याने याबाबत काही लिखाणही केले आहे.
पाहा व्हिडीओ: