‘शॉटगन’ शत्रुघ्न सिन्हांचा आज काँग्रेसमध्ये प्रवेश
नवी दिल्ली : भाजपला सोडचीठ्ठी देत अभिनेते आणि भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा आज काँग्रेस प्रवेश करणार आहेत. आज (28 मार्च) दिल्ली येथे सकाळी 11 वाजता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शत्रुघ्न सिन्हा पक्षप्रवेश करतील. गेले अनेक दिवस शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसमध्ये जाणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र या चर्चांना आता पूर्ण विराम मिळाला […]
नवी दिल्ली : भाजपला सोडचीठ्ठी देत अभिनेते आणि भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा आज काँग्रेस प्रवेश करणार आहेत. आज (28 मार्च) दिल्ली येथे सकाळी 11 वाजता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत शत्रुघ्न सिन्हा पक्षप्रवेश करतील. गेले अनेक दिवस शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसमध्ये जाणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र या चर्चांना आता पूर्ण विराम मिळाला आहे.
गेले अनेक दिवसांपासून शत्रुघ्न सिन्हा हे भाजपावर नाराज होते. त्यांनी अनेकदा आपल्या भाषणातून नाराजी व्यक्त केली आहे. तसेच ते विरोधी पक्षांच्या पश्चिम बंगाल येथील सभेतही सहभागी झाले होते. शिवाय, तेथे त्यांनी भाजपच्या विरोधात भाषणही केले होते. त्यामुळेच सिन्हांना भाजपने तिकीट दिलं नसल्याची चर्चा आहे. मात्र सिन्हा आता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याने सिन्हांच्या मतदारसंघात कडवी लढत दिसणार आहे. बिहारमधील पटना साहिब या मतदारसंघात भाजपकडून केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पटनासाहिब हा शत्रुघ्न सिन्हा यांचा मतदार संघ आहे.
भाजपचे वरीष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना डावलल्यामुळे शत्रुघ्न सिन्हा हे भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावर नाराज होते. तसेच सिन्हांनी सोशल मीडियावर आणि माध्यामांसमोरही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका करत होते, तर दुसरीकडे ते काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे कौतुक करतानाही दिसले. राहुल गांधींच्या किमान वेतन आयोगाच्या योजनेचेही त्यांनी कौतुक केले होते.
कोण आहेत शत्रुघ्न सिन्हा?
भारतीय चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता म्हणून शत्रुघ्न सिन्हा यांची ओळख आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी आतापर्यंत अनेक चित्रपट केले आहेत. यासोबतच अनेक पुरस्कारांनीही त्यांना गौरविण्यात आलं आहे. सिन्हांचे लोहा, दोस्त, शान, प्यार का रिश्ता, तकदीर असे अनेक चित्रपट आतापर्यंत गाजले आहेत.
चित्रपटानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. बिहारमधून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवत विजयही मिळवला होता. त्यावेळी त्यांनी आरोग्यमंत्री म्हणून बिहारमध्ये काम केलं आहे. याशिवाय शत्रुघ्न सिन्हा यांनी राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहात आपला ठसा उमटवला आहे.