“मुख्यमंत्री 20 तास काम करतात, हे लोकांच्या डोळ्यांमध्ये खुपतंय”, पित्याची बाजू घेत श्रीकांत शिंदे यांची विरोधकांवर टीका

खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचं कौतुक करत विरोधकांना टोला लगावला आहे.

मुख्यमंत्री 20 तास काम करतात, हे लोकांच्या डोळ्यांमध्ये खुपतंय, पित्याची बाजू घेत श्रीकांत शिंदे यांची विरोधकांवर टीका
Follow us
| Updated on: Sep 11, 2022 | 1:21 PM

मुंबई : खासदार श्रीकांत शिंदे (Shikant Shinde) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचं कौतुक करत विरोधकांना टोला लगावला आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) 20 तास काम करतात, हे लोकांच्या डोळ्यांमध्ये खुपतंय”, असं श्रीकांत शिंदे म्हणालेत. तसंच विरोधकांना जिथं-तिथं फक्त एकनाथ शिंदेच दिसतात. विरोधकांच्या तर स्वप्नातही एकनाथ शिंदे येतात, असंही ते म्हणालेत.

राज्यामध्ये जे सरकार आले ते मेजॉरिटीचं सरकार आहे. बाकी लोक बोलत असतात. त्यांचं ते कामच आहे. विरोधी बाकावर बसल्यापासून त्यांच्याकडे करण्यासारखं काहीही उरलेलं नाही. त्यामुळे विरोधक सरकारवर टीका करतात, असंही श्रीकांत शिंदे म्हणालेत.

गणेशोत्सव काळात एकनाथ शिंदे यांनी विविध ठिकाणी जात गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यावर विरोधकांकडून टीका करण्यात आली. त्याला आता श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

हे सुद्धा वाचा

आता शिंदेसाहेब चांगलं काम करत आहेत. विरोधकांना पूर्ण वेळ केवळ शिंदेसाहेबच दिसतात. स्वप्नामध्ये पण शिंदे साहेब येतात. सगळ्यांच्या म्हणजे शिंदेसाहेब गणेश उत्सवामध्ये ज्या प्रकारे फिरले. फक्त गणेश उत्सव नाही, त्याबरोबर शासकीय कामकाज सरकारचे निर्णय घेण्याचे निर्णय शिंदे साहेबांनी घेतले. एवढ्या मोठ्या प्रमाणात हा माणूस काम कसा करू शकतो? असा प्रश्न विरोधकांना पडलाय, असंही शिंदे म्हणालेत.

दिवसातील 20 तास शिंदेसाहेब काम कसा करू शकतात? असं अनेकांना वाटतं. या सगळ्या गोष्टी आता डोळ्यांमध्ये खुपयला लागलेल्या आहेत. ही तर केवळ सुरुवात आहे. मी याआधीही सांगितलं आहे की ये तो झाकी है पिक्चर अभी बाकी है!, असं म्हणत श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.