सातारा : राज्यात विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. वेगवेगळ्या पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे श्रीमंत कोकाटे यांनीदेखील भाजप आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी भाजप आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना साखरसम्राट म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे. कोकाटे सातारा येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. (Shrimant Kokate criticizes BJP and Mahavikas Aghadi candidate)
पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजप पक्षातर्फे संग्राम देशमुख निवडणुकीच्या मैदानात आहेत. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून अरुण लाड निवडणूक लढवत आहेत. तर श्रीमंत कोकाटे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत प्रचार सुरु केला आहे.
यावेळी संग्राम देशमुख आणि अरुण लाड यांना कोकाटे यांनी लक्ष्य केलं. “दोन साखरसम्राट पदवीधऱच्या निवडणुकीत उतरले आहेत. या दोन्ही उमेदवारांनी शेतकऱ्यांना फसवले, जिल्हा बँकेचे कर्ज बुडवले. हेच साखरसम्राट आता पदवीधरांचे शोषण करायला निघालेत.” अशी टीका कोकाटे यांनी केली.
तसेच, “गोपुजचा हिंदुस्थान शुगर मिल हा साखर कारखाना संग्राम देशमुख यांचा आहे. तर, महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड हे क्रांती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. यामुळे दोन्ही उमेदवार सहकारी साखर कारखान्याशी निगडीत आहेत. कारखानदार आणि पदवीधरांचे प्रश्न भिन्न आहेत. ज्यांनी ऊसाचा काटा मारला त्यांचाच काटा काढण्यासाठी मी निवडणूक लढवीत आहे,” असेही कोकोटे म्हणाले. तसेच, जनता साखरसम्राटांचा काटा काढल्या शिवाय राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पुणे पदवीधर प्रमुख उमेदवार
अरुण लाड ( राष्ट्रवादी काँग्रेस )
संग्राम देशमुख (भाजप)
रुपाली पाटील ( मनसे )
शरद पाटील ( जनता दल )
सोमनाथ साळुंखे (वंचित बहुजन आघाडी )
श्रीमंत कोकाटे ( इतिहास संशोधक)
डॉ.अमोल पवार ( आम आदमी पक्ष)
अभिजित बिचुकले (अपक्ष)
पुणे पदवीधर मतदारसंघ 2014 निकाल
उमेदवार मते
चंद्रकांत पाटील (विजयी) ६१,४५३
सारंग पाटील ५९,०७३
अरुण लाड ३७,१८९
शैला गोडसे १०,५९४
शरद पाटील ८,५१९
पुणे शिक्षक प्रमुख उमेदवार
जयंत आसनगावकर ( काँग्रेस)
दत्तात्रय सावंत (अपक्ष)
सम्राट शिंदे (वंचित)
डॉ.सुभाष जाधव (एमफुक्टो)
(Shrimant Kokate criticizes BJP and Mahavikas Aghadi candidate)
VIDEO : Raosaheb Danve | पवारांना माझ्यावर टीका करण्याचा अधिकार – रावसाहेब दानवे @raosahebdanve pic.twitter.com/eyIE1D1MTu
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 24, 2020
संंबंधित बातम्या :
पुणे पदवीधर स्पेशल रिपोर्ट : दोन ‘पाटील’ प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला, मनसेमुळे तिरंगी लढत
पुणे पदवीधर मतदारसंघासाठी चंद्रकांतदादा मैदानात, सांगलीत चक्क शिवसेना जिल्हाप्रमुखाशी गुप्त चर्चा