श्रीपाद छिंदमच्या अडचणी वाढण्याची चिन्हं
अहमदनगर: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नगरसेवक श्रीपाद छिंदमच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. छिंदमसह त्याच्याविरोधात निवडणूक लढवून पराभूत झालेल्या उमेदवारांना, तसेच राज्य निवडणूक आयोग, निवडणूक निर्णय अधिकारी, महापालिका आयुक्तांना न्यायालयाने नोटीस बजावून आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले आहेत. प्रभाग ९ ‘क’ मधील उमेदवार सत्यवाद म्हसे यांनी छिंदमच्या निवडीविरोधात अॅड. सुहास टोणे यांच्या माध्यमातून न्यायालयात […]
अहमदनगर: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नगरसेवक श्रीपाद छिंदमच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. छिंदमसह त्याच्याविरोधात निवडणूक लढवून पराभूत झालेल्या उमेदवारांना, तसेच राज्य निवडणूक आयोग, निवडणूक निर्णय अधिकारी, महापालिका आयुक्तांना न्यायालयाने नोटीस बजावून आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले आहेत.
प्रभाग ९ ‘क’ मधील उमेदवार सत्यवाद म्हसे यांनी छिंदमच्या निवडीविरोधात अॅड. सुहास टोणे यांच्या माध्यमातून न्यायालयात याचिका दाखल केली होती. म्हसे यांनी छाननी प्रक्रियेत छिंदमसह प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या विरोधात आक्षेप घेतला होता. त्यानंतर उच्च न्यायालयातही दाद मागितली होती. न्यायालयाने निवडणूक झाल्यानंतर इलेक्शन पीटिशन दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार म्हसे यांनी याचिका दाखल केली आहे.
न्यायालयाने राज्य निवडणूक आयोग, निवडणूक निर्णय अधिकारी, महापालिका आयुक्त, नगरसेवक छिंदम, प्रवीण जोशी, अजयकुमार लयचेट्टी, प्रदीप परदेशी, पोपट पाथरे, अनिता राठोड व सुरेश तिवारी यांना नोटीसा बजावून म्हणणे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील सुनावणी उद्या 20 डिसेंबरला होणार आहे.
त्यामुळे छिंदमच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. छिंदम निवडून आल्यामुळे सर्वांनी आचार्य व्यक्त केलं होतं. त्यामुळे छिंदमची उमेदवारी रद्द होते का, हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
संबंधित बातम्या
जिंकलेला छिंदम पुन्हा हरणार? कोर्टात याचिका
छिंदम कसा जिंकला? महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं!
विजयानंतर श्रीपाद छिंदम शिवरायांसमोर नतमस्तक