राहुल गांधी यांचं भाषण की कॉमेडी सर्कस? यांना राजकारणातील इम्रान हाश्मी म्हणायचं का?; नितेश राणे यांचा घणाघात

तुम्हाला वेळ असेल तर नरेंद्र मोदी यांना नारायण राणेंचा किती अभिमान आहे. ते त्यांच्या मंत्रालयात जाऊन विचारा. कोकणावर लागलेला कलंक आम्ही 2024 ला पुसून टाकणार आहे, असं म्हणत नितेश राणे यांनी ठाकरे गटावर प्रहार केलाय.

राहुल गांधी यांचं भाषण की कॉमेडी सर्कस? यांना राजकारणातील इम्रान हाश्मी म्हणायचं का?; नितेश राणे यांचा घणाघात
Follow us
| Updated on: Aug 10, 2023 | 1:41 PM

सिंधुदुर्ग | 10 ऑगस्ट 2023 : राहुल गांधी यांचं कालचं भाषण सध्या चर्चेत आहे. तसंच या भाषणादरम्यानची त्यांची कृतीही चर्चेत आली आहे. राहुल गांधी यांनी संसदेत फ्लाईंग किस दिल्याचा आरोप भाजपने केला आहे. यावरुन काल संसदेत प्रचंड गदारोळ झाला. आज ठिकठिकाणी भाजपने मोर्चे काढले आहेत. राहुल गांधी यांच्या कृतीवर आक्षेप नोंदवला जात आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात मुंबई महिलांनी आंदोलन केलं. तर सिंधुदुर्गात भाजप आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे. राहुल गांधी यांच्या भाषणावरही नितेश राणे यांनी टीका केली आहे.

राहुल गांधी यांचं संसदेत काल जे भाषण झालं त्याला भाषण म्हणायचं की कॉमेडी सर्कस?, असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे. राहुल गांधी फ्लाईंग किस देत फिरत होते. एका महिला सदस्याला फ्लाईंग किस देणं कितपत योग्य आहे? ज्यांना महिला खासदारांना फ्लाईंग किस देणं योग्य वाटत त्याला काय म्हणायचं? राजकारणातला इम्रान हाश्मी म्हणायचं का?, असं नितेश राणे म्हणालेत.

राहुल गांधी फ्लाईंग किस प्रकरणावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. भाजप कशाचं प्रदर्शन करेल हे माहीत नाही. राहुल गांधी यांनी देशासाठी जादूचा फ्लाईंग किस दिलं. भारत जोडो यात्रेत अनेक असे फ्लाईंग किस त्यांनी दिले होते, असं संजय राऊत म्हणाले. त्यांच्या वक्तव्यावर नितेश राणेंनी पलटवार केलाय. संजय राऊतला फार प्रेम कळतं. महिलांना अश्लिल शिव्या घालतो त्यांच्या घराबाहेर कुत्रे ठेवतो. अमित शाहा यांच्या भाषणानंतर चिडचिड नेमकी कोणाची झाली हे आज सकाळच्या पत्रकार परिषदेत दिसली, असं नितेश राणे म्हणाले.

काल संसदेत अमित शहा यांच ऐतिहासिक भाषण झालं. त्या भाषणाच्या मिरच्या विरोधी पक्षाला झोंबल्या आहेत. त्याचे परिणाम महाराष्ट्र राज्यातही जाणत आहेत, असंही ते म्हणाले.

कोकणावर लागलेला कलंक म्हणजे विनायक राऊत आहेत. संसदेत नारायण राणेंनी ठाकरे गट आणि उद्धव ठाकरे यांची औकात दाखवली. त्यामुळे त्यांना मिरच्या झोबंल्या आणि संपलेल्या खासदारांचं थोबाड उघडलं, असं म्हणत नितेश राणे यांनी ठाकरे गटावर प्रहार केला आहे.

महिला अत्याचाराच्या विरोधात ठाकरे गटाचे आमदार आज राज्यपालांना भेटणार आहेत.हा मोठा जोक आहे. पत्रकार हल्ल्याबाबत संजय राऊतला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांवर टीका करण योग्य आहे का? तुमच्या काळात किती पत्रकारांवर हल्ले झाले. संजय राऊतांना हे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असं म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊतांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.