Sanjay Raut : संजय राऊत थोबाड उघडणार तेव्हा उद्धव ठाकरे खड्ड्यात जाणार; कुणाचा घणाघात?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे दंगल घडविण्यात पहिल्या क्रमांकावर, त्यांची चौकशी झालीच पाहिजे; कुणी केली मागणी? जगातील सर्वात मोठा शहाणा विनायक राऊत आहे. थोडा शहाणपणा मतदार संघात दाखवावा. आमचा खासदार मातोश्रीवर चहा देताना दिसतो, असं म्हणत या नेत्याने ठाकरे गटावर घणाघात केलाय.
महेश सावंत, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, सिंधुदुर्ग : 17 ऑक्टोबर 2023 : माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी लिहिलेल्या मॅडम कमिशनर या पुस्तकावरून सध्या वाद सुरु आहे. यावरून भाजप नेत्यांने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मीरा बोरवणकर यांनी काल पत्रकार परिषद घेतली. त्यातील एक मुद्दा नजर चुकीने राहिला असेल त्याचा व्हिडिओ प्ले केला. उद्धव ठाकरे दंगल घडविण्यात अग्र क्रमांकावर आहेत. काल त्याबाबत मीरा बोनवनकर यांनी सांगितलं आहे. मिलिंद नार्वेकर आणि नीलम गोरे यांना उद्धव ठाकरेंनी आदेश दिले होते. दंगल घडविण्यात उद्धव ठाकरेंचा हात होता. हा दुसरा पुरावा आहे. ज्या उद्धव ठाकरेंनी आदेश दिले. त्या उद्धव ठाकरेंची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे. नितेश राणे यांनी सिंधुदुर्गात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
उद्या राम भक्तांना काय गालबोट लागलं तर जबाबदार उद्धव ठाकरे असणार आहेत. संजय राऊत ठाकरे गटाची किती वाट लावणार ह्याला मर्यादा नाही. संजय राऊत जेवढं थोबाड उघडणार तेव्हा तेव्हा उद्धव ठाकरे खड्ड्यात जाणार! दीपक केसरकर यांनी म्हणाल्याप्रमाणे, संजय राऊतांमुळे उद्धव ठाकरे आणि मोदी भेट झाली नाही. संजय राऊत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर प्रभाव टाकत आहेत. याची दखल न्यायालयाने घ्यावी, असंही नितेश राणे म्हणाले.
संजय राऊत तुझं वेळ पत्र ठरलेलं आहे. तुझ्या घरातील एक माणूस आणि तू दिवाळीत जेलमध्ये जाणार आहे. हिंमत असेल 24 तासासाठी संरक्षण सोड. मग जुने शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत ते तुझे कपडे काढून गाढवावरून तुझी धिंड काढतील. ज्याला बाळासाहेब कळले नाहीत. ज्यांच्यासोबत बाळासाहेबांनी युती केली नाही. त्यांचे गोडवे आता राऊत गात आहे. त्यांच्या प्रेमात पडला आहे. येणाऱ्या निवडणुकीनंतर ठाकरे गट नावाची सेना शिल्लक राहणार नाही, असा घणाघातही नितेश राणे यांनी केला आहे.
माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकातील एका मुद्द्यावरून सध्या वाद सुरु आहे. या पुस्तकात त्यांनी अजित पवार यांच्यावर काही आरोप केलेत. यावरही नितेश राणे यांनी भाष्य केलं आहे. अजितदादांवर ठाकरे गट आणि उर्वरित लोक टीका करता आहेत. हेच पुस्तक जर महाविकास आघाडीच्या काळात आलं असतं तर अजित दादा वाईट असते का?, असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे.
आरएसएससारखी राष्ट्र भक्त संघटना दुसरी कोणतीही नाही. ज्यांनी पाकिस्तानसोबत नातं जोडलं त्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये. राष्ट्रद्रोह्यांसोबत बसलेल्यांना आरएसएस कधीच समजणार नाही, असं म्हणत नितेश राणे यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.