“उद्धव ठाकरे यांच्याशी संबधितांचा दंगली घडवायचा प्रयत्न, त्यांची नार्को टेस्ट करा”

Nitesh Rane on Uddhav Thackeray : ठाकरे गट राष्ट्रवादीची ढ टीम!, उद्धव ठाकरेंच्या नार्को टेस्टची मागणी; नितेश राणे नेमकं काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांच्याशी संबधितांचा दंगली घडवायचा प्रयत्न, त्यांची नार्को टेस्ट करा
Follow us
| Updated on: Jun 27, 2023 | 2:19 PM

सिंधुदुर्ग : जे जे उद्धव ठाकरेंशी निगडित आहेत त्यांना दंगली घडवायचा प्रयत्न आहे. म्हणून उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट व्हावी, अशी मागणी भाजपचे नेते नितेश राणे यांनी केली आहे. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबच्या कबरीवर माथा टेकला. त्यावरून नितेश राणे यांनी ठाकरेंना प्रश्न विचारला आहे. उद्धव ठाकरेंना हा प्रश्न विचारा की, जे हिंदूंची बदनामी करतात. छत्रपतींची बदनामी करतात त्यांच्यासोबत तुम्ही युती करता? याच उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावं, असं नितेश राणे म्हणालेत.

प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आम्ही मांडीला मांडी लावून बसत नाही जे त्यांच्या सोबत बसतात त्यांना विचारा की तुम्हाला शिवरायांचा अवमान तुम्हाला चालतो का? , असं नितेश राणे म्हणालेत.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर पंढरपुरात आहेत. काही वेळा आधी त्यांनी विठ्ठल मंदिरात जात दर्शन घेतलं. त्यावर नितेश राणे यांनी टिपण्णी केली आहे. आज सकाळी तेलंगणाचे मुख्यमंत्री विठ्ठलाच्या दर्शनाला आले आहेत. केसीआर ही भाजपाची दुसरी टीम आहे असं म्हणणाऱ्यांना हे झोंबलं. शिवसेना ठाकरे गट ही राष्ट्रवादीची ढ टीम आहे, असं नितेश राणे म्हणालेत. तेलंगणाच्या मुख्यमंत्री यांनी हिंदूंच्या देवाचे दर्शन घेतले म्हणून त्यांच्या पोटात पोटशूळ उठतोय, असंही ते म्हणालेत.

संजय राऊत शुद्धीत आहे का? तू तुझ्या मालकाचा पक्ष आणि मुलगा हे भाजपसोबत असताना इतर राज्यात निवडणुका लढविल्या आहेत. थोबाड रंगवायला जायचं ना… काल शाखा तोडली त्यावर शिवसेनेच्या नेत्यांनी आरडाओरड केली. पालिका अधिकाऱ्यांनी फोटो तोडण्याअगोदर काढण्याची परवानगी दिली होती. लोकांच्या डोळ्यात धूळ फेक करण्याचे काम करतात. लोकांची घरे तोडलीत तुम्हाला आठवण आहे का? की तुम्ही गजनी झालात, असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे. सर्वात मोठा नीXX मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर बसतो. स्वतःच्या घराबद्धल विचार केला मग शाखांचा विचार का नाही केला त्या नियमित का नाही केल्या? ज्या भागात मातोश्री आहे. त्याच विभागात महिला भगिनींना पाण्यासाठी मोर्चा काढावा लागतो ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. त्या सर्व अनधिकृत बांधकामाना उद्धव ठाकरेचा आशीर्वाद होता का? ज्यांनी ज्यांनी अधिकाऱ्यांवर हात उचलला त्यांच्यावर कारवाई होणारच आहे, असा घणाघात नितेश राणे यांनी केला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.