“उद्धव ठाकरेंच्या भोवती सुषमा अंधारेंसारखे लोक, म्हणून नीलमताईंसारख्या निष्ठावंतांनी पक्ष सोडला”
Nitesh Rane on Neelam Gorhe inter in Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात संजय राऊत संपलेला माणूस; कुणी डागलं टीकास्त्र
सिंधुदुर्ग : ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्या नीलम गोऱ्हे यांनी काल शिवसेनेत प्रवेश केला. नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडणं अनेकांसाठी धक्कादायक आहे. अशातच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत नीलम गोऱ्हे यांच्या पक्षांतरावर भाष्य केलंय. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केलीय.
उद्धव ठाकरेंच्या अवतीभवती संजय राऊत यांच्यासारखे दलाल आहेत. सुषमा अंधारेंसारखे लोक आहेत. म्हणून नीलम गोऱ्हेंसारखे निष्ठावंत पक्ष सोडून जात आहेत, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
विधानपरिषदेच्या उपसभापती @neelamgorhe ताई यांनी आज #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी त्यांचे पक्षात स्वागत करीत त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीकरता शुभेच्छा दिल्या.
यासमयी उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis, ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री @girishdmahajan,… pic.twitter.com/PmhkARb1wR
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 7, 2023
पंढरपूरला आज गेलेला संजय राऊत महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा बडवा आहे, असा घणाघात नितेश राणे यांनी केला आहे.
आजच्या सामनाच्या अग्रलेखात अजित पवार यांचं बंड आणि युती सरकारवर टीका करण्यात आली आहे. त्यावरही नितेश राणे यांनी भाष्य केलं आहे. संत परंपरेवर लिहिलाय. पण नाईटलाईफचे संत नेमके कोण आहेत?, असं नितेश राणे म्हणाले आहेत.
संजय राऊतांच्या मालकाचा मुलगा दिवाळीपर्यंत आर्थर रोड जेलमध्ये नाईट लाइफ साजरा करत असेल, असा घणाघात नितेश राणे यांनी केला आहे.
मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचार प्रकरणी काही रेड पडल्या. हायवे कन्ट्रक्शन, रोम्बील बिल्डर्स, पुनिया पारेख हे कोण आहेत , कोणासाठी पैसे खाल्ले? मुंबईत पेंग्विन हायवे कन्ट्रक्शन कंपनीने आणलं. आदित्य ठाकरेच्या हट्टापायी आणलं. रोम्बील कन्ट्रक्शनने कोविड सेंटर बांधले. डोक्याचा आजार बरा करायला पायाचा डॉक्टर उभा करण्यात आला. राहुल गोम्स हा मुंबई महापालिकेचा जावई होता. ही सगळी आदित्य ठाकरेंची माणसं आहेत. डिनोच्या घरी बसून साडे सात नंतर कोणी कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं हे ठरवणारी ही माणसं आहेत, असं नितेश राणे म्हणालेत.
मुंबई लुटणारेच अधिकाऱ्यांना धमक्या देत आहेत. बाळासाहेबांच्या घरात काड्या लावल्या. त्याच शरद पवारांच्या घरात काड्या लावण्याचे काम संजय राऊतने केलं आहे. संजय राऊत महाराष्ट्राच्या राजकारणातील संपलेला माणूस आहे, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.