मोदींमुळे देशाला नवी ओळख मिळाली, ती म्हणजे…; नितेश राणे यांच्याकडून केंद्र सरकारच्या 9 वर्षांच्या कारकीर्दीचा आढावा

Nitesh Rane on PM Narendra Modi 9 Years Work : नरेंद्र मोदी यांचं कामकाज, जगभरातील वाढता दबदबा अन् 9 वर्षांचा आढावा; पाहा नितेश राणे काय म्हणाले...

मोदींमुळे देशाला नवी ओळख मिळाली, ती म्हणजे...; नितेश राणे यांच्याकडून केंद्र सरकारच्या 9 वर्षांच्या कारकीर्दीचा आढावा
Follow us
| Updated on: May 31, 2023 | 3:20 PM

सिंधुदुर्ग : भाजपचे नेते नितेश राणे आणि निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा त्यांनी मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या कामकाजावर भाष्य केलंय. 2014 ते 23 पर्यंत मोदीसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या भारताने सुवर्णकाळ अनुभवला. भारताची प्रतिमा आज जगामध्ये महासत्ताक होण्याच्या दिशेने जाणारा देश, संकटकाळात विविध देशांना मदत करणारा देश अशी नवीन ओळख तयार केली आहे, असं नितेश राणे म्हणालेत.

काँग्रेसच्या काळात देशाची एक वेगळी प्रतिमा होती.भ्रष्टाचाराने बरबटलेला देश अशी तेव्हा ओळख होती. ती ओळख आता पुसली गेली आहे. महासत्ताक होण्याच्या दिशेने जाणारा देश अशी ओळख सध्या भारताची होते आहे. ही अतिशय अभिमानाची बाब आहे, असं नितेश राणे म्हणाले.

शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, बेरोजगारांना त्यांचा मान देणं,सन्मान देणं हे या सरकारनं केलं आहे. काँग्रेस सरकारच्या काळात योजना जाहीर व्हायच्या पण योजनांचा पैसा लालफितीतच अडकून पडायच्या. आर्थिक समृद्धी दारात आणण्याचं काम मोदी सरकारच्या हातून झालेलं आहे.

2014 च्या अगोदर रत्नागिरी असो सिंधुदुर्ग असो मच्छीमारांसाठी चुकून प्रस्ताव यायचे. पण आता मुंबई गोवा महामार्गाचा विकास झाला. त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक येऊ शकले. मुद्रा योजना, पंतप्रधान आवास योजनाचे मोठ्या संख्येने देशात लाभार्थी झाले आहेत

सबका साथ, सबका विकास या घोषणेमुळे धार्मिक स्थळांचा विकास करण्यात आला. ना खाऊंगा ना खाणे दूँगा यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसला आहे. कोरोना काळात विविध देश संघर्ष करत होते तेव्हा व्हेक्सींन पाठवून देशाला सन्मान मिळवून दिला. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन पंतप्रधान मोदींचा ऑटोग्राफ घेण्यासाठी पुढे आले. जगभरात भारताची प्रतिमा बदलली आहे, असं म्हणत नितेश राणे यांनी मोदी सरकारच्या कामकाजावर प्रकाश टाकला.

निलेश राणे म्हणाले…

भाजपच्या या पत्रकार परिषदेत निलेश राणेदेखील उपस्थित होते. त्यांनी विरोधी पक्षावर विशेषत: शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. विरोधी पक्ष एकत्र आले तरी 2024 ला काही फरक पडणार नाही.शरद पवार केंद्रासाठी नेहमी आघाडी करतात. पण काही होत नाही. काँग्रेसमध्ये केंद्रीयमंत्री असताना ही शरद पवारांनी असा प्रयोग केला होता. विरोधी पक्षांच्या एकत्र येण्याला गांभीर्याने घेऊ नका, असं निलेश राणे म्हणालेत.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.