सहा महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका?
मुंबई : महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना महायुतीचं सरकार आणि केंद्रातील भाजपप्रणित एनडीए सरकारच्या कार्यकाळाला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे. त्यातच आता सूत्रांच्या माध्यमातून अशी माहिती समोर येतेय की, महाराष्ट्रात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका सोबत होण्याची शक्यता आहे. लोकसभेसोबतच राज्याच्या विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. त्यामुळे […]
मुंबई : महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना महायुतीचं सरकार आणि केंद्रातील भाजपप्रणित एनडीए सरकारच्या कार्यकाळाला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे. त्यातच आता सूत्रांच्या माध्यमातून अशी माहिती समोर येतेय की, महाराष्ट्रात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका सोबत होण्याची शक्यता आहे. लोकसभेसोबतच राज्याच्या विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात येत्या सहा महिन्यातच विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लोकसभा निवडणुकीसोबत घेण्याचा विचार अनेक महिन्यांपासून विविध पक्षातील विविध नेत्यांनी बोलूनही दाखवला आहे. मात्र, आता निवडणूक आयोगानेही महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लोकसभेसोबत घेण्याला तयारी दाखवली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. नियोजित कार्यकाळानुसार लोकसभेच्या निवडणुका मे महिन्यात, तर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यात पार पडतील. मात्र, सूत्रांची माहिती खरी ठरल्यास, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका लोकसभेसोबत म्हणजेच मे महिन्यातच होतील. म्हणजेच, येत्या पाच-सहा महिन्यातच निवडणुकांचे बिगुल वाजतील. सध्या देशात राजस्थान, मध्य प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहे. या पाच राज्यांच्या निकालावर आगामी निवडणुकांच्या तारखा निश्चित होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे. मात्र, जर विधानसभा आणि लोकसभा निवडणुका सोबत झाल्यास, महाराष्ट्रासह एकूण सात राज्यांच्या निवडणुका लोकसभेसोबत म्हणजे मे महिन्यातच पार पडण्याची शक्यता आहे. आता राजस्थान, मध्य प्रदेशसह इतर पाच राज्यांचे निकाल येत्या पंधरा दिवसात स्पष्ट होतील. त्यानंतर आगामी निवडणुकांचे चित्रही स्पष्ट होईल. मात्र, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका लोकसभेसोबत होणार असतील, तर निवडणुकांना अवघे पाच ते सहा महिनेच उरणार आहेत. त्यामुळे राज्यात निवडणुकांचे वारेही जोरात वाहू लागेल, यात शंका नाही.