Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आणखी एका खासदाराची खासदारकी रद्द, लोकसभा सचिवालयाची कारवाई, काय आहे कारण ?

लोकसभा सचिवालयाने सोमवारी 1 मे रोजी यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. हा खासदाराने दोन वेळा खासदारकी भूषविली आहे. या खासदाराला न्यायालयाने चार वर्षाची सजा सुनावल्याने लोकसभा सचिवालयाने हा निर्णय घेतला आहे.

आणखी एका खासदाराची खासदारकी रद्द, लोकसभा सचिवालयाची कारवाई, काय आहे कारण ?
MP AHMAD ANSARI Image Credit source: TV9 NETWORK
Follow us
| Updated on: May 01, 2023 | 9:25 PM

उत्तर प्रदेश : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने तातडीने त्यांचे लोकसभा सदस्यत्व संपुष्टात आणले. राहुल गांधी यांच्या पाठोपाठ आता आणखी का खासदारावर लोकसभा सचिवालयाने कारवाई केली आहे. लोकसभा सचिवालयाने सोमवारी 1 मे रोजी यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. हा खासदाराने दोन वेळा खासदारकी भूषविली आहे. या खासदाराला न्यायालयाने चार वर्षाची सजा सुनावल्याने लोकसभा सचिवालयाने हा निर्णय घेतला आहे.

गाझीपूरच्या एमपी एमएलए न्यायालयाने खासदार अफजल अन्सारी यांना गँगस्टर अॅक्ट प्रकरणात चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. लोकप्रतिनिधी कायद्यातील फौजदारी खटल्यात, दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झालेल्या कोणत्याही व्यक्तीला ‘अशा शिक्षेच्या तारखेपासून’ अपात्र ठरवले जाईल आणि तुरुंगात राहिल्यानंतर सहा वर्षांपर्यंत अपात्रता कायम राहील या तरतुदीनुसार लोकसभा सचिवालयाने हा निर्णय घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे गुन्हा ?

अफजल आणि मुख्तार अन्सारी यांच्यावर 22 नोव्हेंबर 2007 रोजी गाझीपूर जिल्ह्यातील मोहम्मदाबाद पोलिस ठाण्यात खून आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 23 सप्टेंबर 2022 रोजी दोघांविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले. पण, न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.

गाझीपूर न्यायालयाचे सत्र न्यायाधीश यांनी खासदार, आमदार अन्सारी बंधूंना शिक्षा सुनावली. अफझल याचा भाऊ माफिया मुख्तार अन्सारी याला गाझीपूर न्यायालयाने या प्रकरणात 10 वर्षांची शिक्षा सुनावली होती. तर, मुख्तारला 5 लाख रुपये आणि अफजलला 1 लाख रुपये दंड ठोठावला होता.

मुख्तार हा बांदा कारागृहात सजा भोगत असून खासदार अफजल जामिनावर बाहेर होते. याप्रकरणी शनिवारी न्यायालयाने मुख्तार आणि अफजल अन्सारी यांना शिक्षा सुनावली.

अफझल अन्सारी याची राजकीय कारकीर्द

अफजल अन्सारी 2004 मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते. यानंतर 2005 मध्ये कृष्णानंद राय खून प्रकरणात त्यांना तुरुंगात जावे लागले होते. 2009 मध्ये त्यांना सपाकडून तिकीट न मिळाल्याने त्यांनी बसपामध्ये प्रवेश केला. त्यावेळी ते पराभूत झाले.

2014 मध्ये त्यांनी बलिया मतदारसंघातून एकता दलाच्या तिकिटावर निवडणूक लढवली. पण पुन्हा त्यांचा पराभव झाला. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी संपूर्ण कुटुंबासह बसपामध्ये प्रवेश केला.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत ते सपा आणि बसपचे युतीचे उमेदवार म्हणून उभे होते. गाझीपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि तो दुसऱ्यांदा खासदार झाला.