सोलापूर : सोलापुरातून सुशिलकुमार शिंदे यांच्या रुपानं राज्याला मुख्यमंत्री मिळाले होते. कॉम्रेड नरसय्या आडम यांच्या रुपाने मार्क्सवाद्यांचा हा कधीकाळी बालेकिल्ला राहिला. कामगारांचे शहर असल्यानं समाजवादापेक्षा मार्सवाद जवळ केला. सोलापूरच्या राजकारणात देशमुख गटही सक्रिय आहे. काँग्रेसची (Congress) पकड पक्की होती. पण, 2014 पासून देशाच्या राजकारणात भाजप आक्रमक झाला. 2017 च्या महानगरपालिकेत अमरावतीसारखीच भाजपनं (BJP) दांडगाई दाखविली. माकप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेला (Shiv Sena) धक्का बसला. 2017 च्या महापालिकेत भाजपनं सत्ता हस्तगत केली. यावेळी युती, आघाडी कशी होते, यावर सर्व गणित अवलंबून राहणार आहे. प्रभाग 26 मध्ये दोन जागा काँग्रेसनं राखल्या होत्या.
सोलापूर मनपा प्रभाग 26 अ
पक्ष | उमेदवार | विजयी आघाडी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष |
सोलापूर मनपा प्रभाग 26 ची लोकसंख्या 23 हजार 576 आहे. त्यापैकी अनुसूचित जातीची लोकसंख्या 6 हजार 157 आहे. तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 283 आहे. सोलापूर मनपा प्रभाग 26 च्या अ मधून काँग्रेसचे शिवा बाटलीवाला, ब मधून काँग्रेसच्या प्रिया माने, तर क मधून शिवसेनेच्या मेनका चव्हाण निवडून आल्या होत्या. प्रभाग 26 अ अनुसूचित जातीसाठी, ब सर्वसाधारण महिलांसाठी, तर क हा सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे.
सोलापूर मनपा प्रभाग 26 ब
पक्ष | उमेदवार | विजयी आघाडी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष |
उत्तर सदर बाजार भाग, दक्षिण सदर बाजार भाग, तालुका पोलीस स्टेशन, सोलापूर क्लब, पोलीस आयुक्त कार्यलय, विणकर वसाहत, विकास नगर, ईएसआय हॉस्पिटल, कृषी नगर व परिसर. उत्तरेकडं लष्कर नळ बाजार चौकापासून पूर्वकडे सतनात चौक ललीत कला भवनच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत. तेथून उत्तरेकडे कुंभर गल्ली, श्री फुले यांच्या घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत. तेथून पूर्वकडे जांबमनी चौकापर्यंत व्हाया सरस्वती चौक. पूर्वकडं जांबमनी चौकापासून दक्षिणेकडे मुख्य रस्त्याने मौलाली चौकापर्यंत. तेथून पुढे पूर्वकडं रस्त्याने शासकयी क्रीडा संकुलाच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत. म्हणजेच 70 फूट रिंगरोडपर्यंत. तेथून दक्षिणकडे 70 फूट रिंगरोडने व्ही. एम. मेडिकल कॉलेज हॉस्टेलच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत. तेथून दक्षिणकेडे होटगी रोडवरील सुदीप कॉम्प्लेक्सच्या उत्तरपूर्व कोपऱ्यापर्यंत. दक्षिण होटगी रोडवरील सुदीप कॉम्प्लेक्सच्या उत्तरपूर्व कोपऱ्यापासून पश्चिमेकडं ब्रॉडगेड रेल्वे रुळापर्यंत. तेथून वायव्येकडे ब्रॉडगेज रेल्वे रुळाने विजापूर रोडवरील ब्रॉडगेज रेल्वे पुलापर्यंत.
सोलापूर मनपा प्रभाग 26 क
पक्ष | उमेदवार | विजयी आघाडी |
---|---|---|
भाजप | ||
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष |