देशाचे तुकडे करु इच्छिणाऱ्यांसोबत दीपिका उभी : स्मृती इराणी
केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी देखील दीपिकावर निशाणा साधला आहे. दीपिका त्या लोकांसोबत उभी आहे, जे देशाचे तुकडे करु इच्छितात, असं म्हणत स्मृती इराणींनी दीपिकावर टीका केली.
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराविरोधात बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी निषेध व्यक्त केला (JNU Attack Protest). अभिनेत्री दीपिका पादूकोणनेही (Deepika Padukone) काही दिवसांपूर्वी जेएनयूमधील विरोधप्रदर्शनात सहभाग घेतला. त्यानंतर साक्षी महाराजांनी (Sakshi Maharaj) दीपिकावर टीका केली होती, यानंतर आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी देखील दीपिकावर निशाणा साधला आहे. दीपिका त्या लोकांसोबत उभी आहे, जे देशाचे तुकडे करु इच्छितात, असं म्हणत स्मृती इराणींनी दीपिकावर टीका केली (Central Minister Smriti Irani).
“दीपिका त्या लोकांसोबत उभी आहे, जे लोक देशाचे तुकडे करु इच्छितात. ज्यानेही ही बातमी वाचली असेल (दीपिकाच्या जेएनयूमध्ये जाण्याबाबतची बातमी), त्याला नक्कीच हे जाणून घ्यायचं असेल की ती आंदोलकांमध्ये का गेली? दीपिका त्या लोकांसोबत उभी आहे जे भारताचे तुकडे करु इच्छितात. ती त्या लोकांसोबत उभी आहे ज्यांनी मुलींच्या गुप्त अंगावर काठ्यांनी हल्ला केला, हे आमच्यासाठी आश्चर्यकारक आहे.”
. @smritiirani takes down Deepika Padukone for supporting Bharat Tere Tukde Gang pic.twitter.com/XzqTmSjeaN
— Tajinder Pal Singh Bagga (@TajinderBagga) January 10, 2020
दीपिका काँग्रेस समर्थक : स्मृती इराणी
स्मृती इराणींनी दीपिकाच्या पॉलिटीकल इंटरेस्टबद्दलही खुलासा केला. “2011 मध्ये दीपिकाने सांगितलं होतं की, ती काँग्रेस समर्थक आहे”.
जेएनयू विवादावर स्मृती इराणी म्हणाल्या, तपास सुरु आहे. पोलिसांकडून तपासाचा अहवाल न्यायालयापुढे सादर करेपर्यंत काहीही वक्तव्य करणं बरोबर नाही.
साक्षी महाराजांचा दीपिकावर आरोप
साक्षी महाराज यांनी दीपिका पादूकोण ही तुकडे-तुकडे गँगची असल्याचा आरोप लावला आहे. विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमारसोबत उभं राहून दीपिकाची आत्मा रडली असेल, असं साक्षी महाराज म्हणाले होते.
Smriti Irani commented on Deepika Padukone