…म्हणून मी भगवे नाही तर पांढरे कपडे घालतो; पत्रकारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. शेतकरी, मतदार, हिंदूत्वाशी कुणी गद्दारी केली हे सगळ्यांना माहिती असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मुंबई : पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना ( Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे. शेतकरी, मतदार, हिंदूत्वाशी कुणी गद्दारी केली हे सगळ्यांना माहिती आहे, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मला पत्रकरांनी विचारले तुम्ही भगवे कपडे का घालत नाहीत? पांढरे कपडे का घातला? तेव्हा त्यांना मी सांगितले की भगवा आमच्या हृदयात आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हटलं मुख्यमंत्र्यांनी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. हिंदूत्व, शेतकरी, मतदार यांच्याशी कोणी गद्दारी केली हे सर्वांना माहिती आहे असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार टोला लगावलाय.
पुढे बोलताना ते म्हणाले की मला एका कार्यक्रमात पत्रकारांनी विचारले तुम्ही भगवे कपडे का घातल नाहीत? पांढरे का घालतात तेव्हा मी त्यांना उत्तर दिले भगवा हा आमच्या हृदयात आहे, असं शिंदे यांनी म्हटलं आहे.
आम्ही बाळासाहेंबाच्या विचाराचे पाईक आहोत, आणि त्यांचाच विचार पुढे घेऊन जात असल्याचंही यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
शिंदे गट, शिवसेना आमने-सामने
अनेकदा शिंदे गट आणि शिवसैनिक आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. दोनच दिवसांपूर्वी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजाकारण चांगलेच तापले होते. रामदास कदम यांच्या या वक्तव्याला शिवसैनिकांकडून आक्रमक प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
दुसरीकडे वेदांतावरून देखील विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. वेदातांवरून देखील शिंदे गटाकडून शिवसेनेवर अनेक आरोप करण्यात आले आहेत.