तर मी तुरुंगातून सुद्धा लोकसभेची निवडणूक लढवेल, रविकांत तुपकर कडाडले

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे जिल्ह्यातील नेत्यांशी आणि जिल्हा प्रशासनाशी वारंवार खटके उडत आहेत. अशा रविकांत तुपकर यांचा जामिन रद्द करण्यात यावा अशी मागणी सरकारी पक्ष कोर्टात करणार आहे. त्यामुळे तुपकर यांना पुन्हा अटक होते का त्यांना जामीन अर्ज मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तर मी तुरुंगातून सुद्धा लोकसभेची निवडणूक लढवेल, रविकांत तुपकर कडाडले
Ravikant Tupkar
Follow us
| Updated on: Feb 07, 2024 | 1:34 PM

गणेश सोळंकी, टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी, बुलढाणा | 7 फेब्रुवारी 2024 : शेतकऱ्यांसाठी वारंवार आंदोनल छेडणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आता वेळ पडली तर तुरुंगातून लोकसभा निवडणूक लढविण्याचा इरादा व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन करताना जिल्ह्यातील प्रशासनाशी त्यांचे वारंवार खटके उडत आहेत. त्यांच्यावर आंदोलन प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून त्यांची जामीन रद्द व्हावा यासाठी सरकारने कोर्टात अर्ज केला आहे. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी जर आपल्याला अटक झाली तर शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आपण रक्ताचा शेवटचा थेंब शिल्लक असेपर्यंत लढणार असून त्यासाठी तुरुंगातूनही निवडणूक लढवू असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

सत्ताधाऱ्यांनी जर मला तुरुंगात टाकलं, तर मी तुरुंगातूनही लोकसभेची निवडणूक लढवणार म्हणजे लढवणारच, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी लढणार आहे अशी घोषणाच आज रविकांत तुपकर यांनी केली आहे. गेल्या काही दिवसापासून रविकांत तुपकर आणि जिल्ह्यातील सत्ताधारी नेत्यांमध्ये शाब्दीक चकमकी उडत आहेत, त्या पार्श्वभूमीवर रविकांत तुपकर यांनी ही घोषणा केली आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी नोटीस दिली आहे. या त्यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. पोलिसांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जात तुपकर यांचा जामीन अर्ज रद्द करावा आणि त्यांना तुरुंगात टाकावे असे पोलिसांनी म्हटले आहे. त्यामुळे कोर्टात काय निर्णय होणार याकडे जिल्हावासीयांचे नव्हे तर राज्याचे लक्ष लागले आहे.

रविकांत तुपकर यांना धमकी

शिंदे गटाचे आमदार संजय रायमुलकर यांचा एका सभेत बोलताना तोल गेला. रायमुलकर यांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना सभेत घुसून कानाखाली मारण्याची भाषा केली होती. रविकांत तुपकर सध्या जिल्ह्यात एल्गार परिवर्तन मेळावे घेत आहेत, गावोगावी जाऊन शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांशी चर्चा करीत आहे. तसेच त्यांच्याकडून लोकसभा लढविण्यासाठी मोठा निधी देखील उभा करीत आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.