मग तेलंगणाचा निकालही मॅनेज होता असं म्हणायचं का?; EVM वरून गिरीश महाजन यांनी सुनावले

चार राज्यातील विधानसभेच्या निकालांवर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपाला मोठ्या राज्यातील यशाची खात्री होती. तेलंगणात भाजपाने फारसा रस दाखविला नव्हता. परंतू आता विरोधकांनी वाचाळवीर बनून राहू नये. राहुल गांधी यांच्या पदयात्रेचा निवडणूक निकालांवर काही परिणाम झाला नाही. या निकालातून मोदी पनवती नाही तर मोदी यशाची गॅरंटी आहे असेही गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

मग तेलंगणाचा निकालही मॅनेज होता असं म्हणायचं का?;  EVM वरून गिरीश महाजन यांनी सुनावले
Girish Mahajan
Follow us
| Updated on: Dec 03, 2023 | 5:00 PM

दत्ता कानवटे, टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी | 3 डिसेंबर 2023 : एक्झिट पोलचे सर्व अंदाज चुकीचे ठरले आहेत. तेलंगणात आम्हाला अपेक्षा नव्हती. मात्र तीन मोठ्या राज्यांकडून अपेक्षा होती, ती राज्ये आम्ही जिंकली आहेत. लोकांना कामावर विश्वास ठेवून मतं दिली नाही. पनवती कोण आहे ? हे या निवडणूकाच्या निकालातून कळले आहे. आम्ही प्रिलियम पास झालो आहोत. आता महाराष्ट्रात होणाऱ्या विधान सभा निवडणूकांमध्ये दोन तृतीयांश मतांनी निवडून येऊ असा आत्मविश्वास ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी निवडणूक निकालानंतर व्यक्त केला आहे.

चार राज्याच्या निकालांमधून वाचाळवीरांना चपराक मिळाली आहे. गेल्या लोकसभेत उबाटा यांचे 18 खासदार मोदींमुळे निवडून आले होते. आता त्यांनी त्यांचा एक खासदार निवडून दाखवावा असेही मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. तेलंगणात जिंकण्याचा आम्ही दावाही केला नव्हता, मात्र जिथे दावा केला होता तेथे आम्हाला यश मिळाले आहे. पराभवानंतर ईव्हीएमचे नाव घेतले जाते. मग तेलंगणामध्ये ईव्हीएम मॅनेज झालं असे आम्ही म्हणायचं का ? दुसऱ्या पक्ष आला की त्याला बी टीम म्हणणे आणि पराभव झाल्यावर ईव्हीएमला दोष देणे ही पळवाट असल्याची टीकाही महाजन यांनी केली आहे.

इंडीया आघाडी राहीली कुठे ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पराभवासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येत इंडीया आघाडी स्थापन केली. परंतू आता इंडीया आघाडी कुठे राहीली ? दुसऱ्या तिसऱ्या मिटींगनंतर सगळे गायब झाले आहेत. त्यांचा नेता कोण ? हे ते ठरवू शकले नाहीत. त्यांचा सगळ्या बोऱ्या वाजला आहे. आघाडी आता राहीली नाही अशी टीकाही यावेळी गिरीश महाजन यांनी केली आहे.

सरसकट आरक्षण देता येणार नाही

मराठ्यांना सरसकट ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही. राज्यात ज्यांच्या नोंदी कुणबी आहेत. त्यांना सर्टीफिकीट वाटप आता झालं आहे. मनोज जरांगे यांना आम्ही दुखवू शकत नाही. परंतू त्यांनी समाजातील अभ्यासक, प्राध्यापक, कुलगुरु आणि विचारवंतांशी बोलल्यानंतर स्पष्ट झाले आहे की ओबीसीतून सरसकट मराठ्यांना ओबीसी आरक्षण देणे कठीण असल्याचे महाजन यांनी सांगितले. लवकर आरक्षण देता येत नाही, ते कोर्टात टिकणार नाही. पूर्वी राणे समितीने दहा दिवसात आरक्षण दिले ते कोर्टात टिकले नाही. आम्हाला टिकणारे आरक्षण द्यायचं असल्याने त्यासाठी वेळ लागणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.