कोल्हापूर : धर्मवीर हे नाव आम्ही ठेवलं नाही. धर्मासाठी संभाजी महाराज यांनी आहुती दिली. धर्मांतर केलं असतं तर त्यांचे प्राण वाचले असते. पण, हाल होऊनसुद्धा ते झुकले नाहीत. धर्मासाठी त्यांनी बलिदान केलं. ते स्वराज्यरक्षक आहेतच. पण, धर्मवीरही आहेत. स्वराज्यरक्षक संभाजी महाराज आहेत. असं शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले. दरम्यान, दीपक केसरकर म्हणाले, अब्दुल सत्तार हे अनेक वेळा गमतीने बोलतात. पण पक्षांतर्गत काही घडामोडी झाल्या असतील तर त्याची दखल मुख्यमंत्री नक्कीच घेतील. देशातील अंतर्गत घडामोडीची जाहीर वाच्यता करण्याची पद्धत नाही. आमच्याही पक्षात असं होणार नाही याची काळजी घेऊ.
विश्व मराठी संमेलनाला शाहू महाराज यांना उपस्थित राहण्याची विनंती करणार आहे. ४, ५ आणि ६ तारखेला हे संमेलन होईल. मराठी लोकांची जगातील मंडळाचे ४९८ प्रतिनिधी मुंबईत येणार आहेत. देशातील एक हजार प्रतिनिधी मराठी बोलणारे येणार आहेत.
दरवर्षी हे मराठी भाषेचं संमेलन होईल. त्यामुळं भाषेचं संवर्धन होईल. जागतिक स्तरावर मराठी संमेलन होणं हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला श्रद्धांजली असल्याचंही दीपक केसरकर यांनी सांगितलं.
राधानगरच्या पर्यटन विकसित व्हावे, यासाठी पैसे उपलब्ध करून देतोय. शिक्षण आणि आरोग्य सुधारावे, यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. सात तारखेला मी पुन्हा येतोय. त्यावेळी शाहू महाराज यांचा ७५ वा वाढदिवस आहे.