सोलापुरातील चिंचपूरमध्ये उद्धव ठाकरेंचा बोलबाला; सात पैकी सात सदस्य विजयी

सोलापूर जिल्ह्यातील पहिला निकाल हाती...

सोलापुरातील चिंचपूरमध्ये उद्धव ठाकरेंचा बोलबाला; सात पैकी सात सदस्य विजयी
जिंकणारच, उद्धव ठाकरेंचा आत्मविश्वास Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 11:20 AM

सोलापूर : राज्यातली सत्ता हातून गेल्यानंतर शिवसेना (Solapur Shivsena) आता पुन्हा एकदा नव्याने उभारी घेतेय. सोलापुरात सात सदस्य असलेल्या चिंचपूर ग्रामपंचायती(Chinchpur Grampanchayat) शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाचे 7 पैकी 7 सदस्य निवडून आलेत. सोलापूरमध्ये उध्दव ठाकरे (Uddhav Thackery) यांच्या गटाचं पहिलं खातं उघडलं आहे. माजी सहकारमंत्री आणि भाजप आमदार सुभाष देशमुख यांना हा मोठा झटका आहे. सोलापुरात देशमुखांचं मोठं वर्चस्व आहे. पण चिंचपूरमधला हा पराभव त्यांना मोठा धक्का देणारा आहे. आता माजी आमदार रविकांत पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील यांच्या गटाकडे सत्ता गेली आहे. आज राज्याच्या 15 जिल्ह्यातील 238 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागतोय. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडेअवघ्या राज्याचं लक्ष आहे.

शिवसेनेचा दणदणीत विजय

राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतर राज्यातील निवडणुकीकडे सर्वाचं लक्ष होतं. अन् अश्यात सोलापुरात शिवसेनेचा दणदणीत विजय झाला आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे. सोलापूर जिल्ह्यातील पहिला निकाल हाती आलाय. यात दक्षिण सोलापूरच्या चिंचपूर ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या उध्दव ठाकरे गटाचे 7 पैकी 7 सदस्य निवडून आलेत. सोलापूरमध्ये उध्दव ठाकरे यांच्या गटाचं पहिलं खातं उघडलं आहे. माजी सहकारमंत्री आणि भाजप आमदार सुभाष देशमुख यांना हा मोठा झटका आहे. सोलापुरात देशमुखांचं मोठं वर्चस्व आहे. पण चिंचपूरमधला हा पराभव त्यांना मोठा धक्का देणारा आहे. आता माजी आमदार रविकांत पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील यांच्या गटाकडे सत्ता गेली आहे.

आज गावागावात धुराळा!

आज राज्याच्या 15 जिल्ह्यातील 238 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल लागतोय. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडेअवघ्या राज्याचं लक्ष आहे. नाशिक जिल्ह्यातील 36, धुळे 41, जळगाव 20, अहमदनगर 13, पुणे 17, सोलापूर 25, सातारा 7, सांगली 1, औरंगाबाद 16, बीड 13, परभणी 2, उस्मानाबाद 9, जालना 27, लातूर 6 आणि बुलडाणा जिल्ह्यातील 5 अशा एकूण 238 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज लागणार आहे. या निवडणुकांसाठी सरासरी 78 टक्के एवढे मतदान झाले होते.

हे सुद्धा वाचा

औरंगाबादेत चुरस!

औरंगाबाद जिल्ह्यातून एकनाथ शिंदे गटाकडे जाणाऱ्या आमदारांची संख्या लक्षणीय आहे. शिवसैनिकांमध्ये शिवसेना आणि शिंदे सेना अशी उभी फूट पडलेली दिसून येतेय. मात्र निवडून दिलेल्या आमदारांनी गट बदलल्यामुळे जनता नाराज आहे, असा आरोप शिवसेनेतर्फे करण्यात येतोय. शिंदेंच्या बंडानंतर प्रथमच औरंगाबादध्ये निवडणूक झाली असून 16 ग्रामपंचायतींसाठी काल मतदान घेण्यात आलं. या ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पुढील काही तासात निवडणुकीचे निकाल हाती येतील. त्यानंतर औरंगाबादमधील विशेषतः ग्रामीण भागातील जनता कुणाच्या बाजूने आहे, याचा कौल कळेल.

Non Stop LIVE Update
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.