लोकशाहीत जनताच जनार्दन, त्यांच्या सूचनेनुसार काम, काँग्रेस आमदार सिद्धराम म्हेत्रेंकडून भाजपप्रवेशाचे संकेत

आषाढीवारीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना सिद्धराम म्हेत्रे त्यांच्या स्वागतासाठी हजर होते. म्हेत्रे यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचीही भेट घेतली होती.

लोकशाहीत जनताच जनार्दन, त्यांच्या सूचनेनुसार काम, काँग्रेस आमदार सिद्धराम म्हेत्रेंकडून भाजपप्रवेशाचे संकेत
Follow us
| Updated on: Aug 30, 2019 | 10:33 AM

सोलापूर : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील आजी-माजी आमदारांनी भाजप-शिवसेनेत प्रवेशाचा सपाटा लावलेला असताना आणखी एक काँग्रेस आमदार (Congress MLA) भाजपच्या गोटात (BJP) जाण्याची शक्यता आहे. अक्कलकोटचे काँग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे (Siddharam Mhetre) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत.

आपण मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी थेट गावात जाऊन संवाद साधत आहोत. मतदारसंघात आणखी फिरणं बाकी आहे. मात्र सत्तेत असलो, तर मतदारसंघातील कामं होतात, असा कार्यकर्त्यांचा सूर असल्याचं सांगत आमदार सिद्धाराम म्हेत्रेंनी सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्याचे संकेत दिले. लवकरच आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी ‘टीव्ही9 मराठी’ला सांगितलं.

आषाढीवारीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना सिद्धराम म्हेत्रे त्यांच्या स्वागतासाठी हजर होते. म्हेत्रे यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे म्हेत्रेंच्या भाजपप्रवेशाच्या चर्चा रंगू लागल्या.

नुकतीच काँग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीलाही आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी दांडी मारली होती. त्यामुळे म्हेत्रे लवकरच काँग्रेसला रामराम करुन भाजपमध्ये जाणार असल्याची अटकळ बांधली जात आहे.

लोकशाहीत जनताच जनार्दन असते. त्यामुळे ज्या सूचना केल्या आहेत त्यांचा मला विचार करावा लागेल, असं सिद्धाराम म्हेत्रे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सोलापुरात उरल्या-सुरल्या काँग्रेसलाही खिंडार पडणार आहे.

कोण आहेत सिद्धराम म्हेत्रे?

  • सिद्धाराम म्हेत्रे यांनी आघाडी सरकारच्या काळात गृहराज्यमंत्रीपद भूषवलं
  • 1997 च्या पोटनिवडणुकीत अक्कलकोट विधानसभेचे काँग्रेसचे आमदार
  • सिद्धराम म्हेत्रे हे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले आहेत
  • सोलापूरच्या राजकारणात सिद्धराम म्हेत्रे यांचा दबदबा आहे.
  • सिद्धराम म्हेत्रे हे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे अत्यंत जवळचे मानले जातात.
  • सोलापूर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत
  • भाजपचा बालेकिल्ला असलेल्या अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात म्हेत्रेंनी तालुका काँग्रेसमय केला
  • गेल्या काही वर्षांपासून काँग्रेस पक्षाबाबत नाराजी
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.