Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विठ्ठल दर्शनाने दिवसाची सुरूवात, गाठीभेटी अन् पक्षप्रवेश; पाहा कसा आहे KCR यांचा आजचा दौरा

K. Chandrashekar Rao KCR Pandharpur Vitthal Mandir Darshan : देवदर्शन, गाठीभेटी अन् पक्षप्रवेश; पाहा कसा असेल KCR यांचा आजचा दौरा

विठ्ठल दर्शनाने दिवसाची सुरूवात, गाठीभेटी अन् पक्षप्रवेश; पाहा कसा आहे KCR यांचा आजचा दौरा
Follow us
| Updated on: Jun 27, 2023 | 9:58 AM

पंढरपूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे दोन दिवसांसाठीच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अख्खं मंत्रिमंडळ घेऊन के चंद्रशेखर राव महाराष्ट्रात आहेत. आजचा दिवस BRS पक्षासाठी महत्वाचा आहे. कारण केसीआर आज महाराष्ट्रात असल्याने मोठ्या घडामोडी घडत आहेत. देवदर्शनाने केसीआर आपल्या दिवसाची सुरुवात करणार आहेत. तसंच काही पक्षप्रवेशही या दौऱ्यात होणार आहेत.

कसा असेल आजचा कार्यक्रम?

केसीआर सोलापूरहून पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत. थोड्याच वेळात ते पंढरपुरात दाखल होतील. आज ते पंढरपूरमध्ये विठ्ठलाची पूजा करणार आहेत. विठ्ठलाचं दर्शन घेऊन ते आपल्या दिवसाची सुरूवात करणार आहेत. यावेळी चंद्रशेखर राव विठ्ठलावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्याची शक्यता आहे.

पंढरपूरात विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतल्यानंतर केसीआर सरकोली गावाकडे रवाना होणार आहेत. भगिरथ भालके यांचा आज BRS पक्षात प्रवेश होणार आहे. या कार्यक्रमासाठी ते रवाना होतील. सरकोली गावात भगिरथ भालकेंच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल. तसंच केसीआर उपस्थितांना संबोधित करतील.

दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास केसीआर सरकोली गावातून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघतील. दुपारी 3:30 वाजता ते तुळजापूरमध्ये दाखल होतील आणि तुळजाभवानीचं दर्शन-पूजा करतील. तर आज दुपारी 4:30 वाजता केसीआर आपला दौरा आटोपून हैदराबादकडे रवाना होतील.

विठ्ठल मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त

केसीआर यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात विठ्ठल मंदिराच्या व्हीआयपी गेटवर महाराष्ट्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुरक्षेत कोणतीही चूक होणार नाही याची खबरदारी महाराष्ट्र पोलिसांकडून घेतली जात आहे. बीडीडीएस पथकानंही मंदीर परिसराची तपासणी केली आहे. केसीआर यांच्या सुरक्षेची जबाबदारी महाराष्ट्र पोलिसांकडून चोख पद्धतीने करण्यात येत आहे. के सी आर राव ताफा घेऊन मंदिर परिसरात थोड्याच वेळात दाखल होणार आहेत.

स्वागताची जय्यत तयारी

तेलंगणा मुख्यमंत्री केएसआर मंत्रीमंडळासह तुळजाभवानी मातेचे दर्शन घेणार आहेत. तुळजापूरमध्ये केसीआर यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. त्यांच्या स्वागताचे बॅनर ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. आज दुपारी साडे तीन वाजता केसीआर घेणार तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतील.

भाजपला धक्का देणार?

भाजपचे तुळजापूरचे नेते देवानंद रोचकरी यांचा फोटो बीआरएस पक्षाच्या बॅनरवर पाहायला मिळत आहेत. त्यामुळे केसीआर यांचा बीआरएस पक्ष भाजपला धक्का देणार असल्याचं दिसत आहेत. देवानंद रोचकरी यांचा देवराज मित्रमंडळ ग्रुपचं तुळजापूर तालुक्यात मोठं प्रस्थ आहे. त्यांचा फोटो पोस्टरवर लागल्याने देवानंद रोचकरी BRS मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होतेय. याआधीही रोचकरी यांनी केसीआर यांची घेतली होती.

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.