सोलापूर मतदारसंघात भाजपचे दोन खासदार विरुद्ध जयसिद्धेश्वर महास्वामी

सोलापूर: निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक 2019 चा कार्यक्रम जाहीर केला. मात्र इकडे सोलापूर लोकसभा मतदार संघात भाजपच्या उमेदवारीसाठी धडपड सुरु आहे. विशेष म्हणजे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत काँग्रेसच्या दिग्गज सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव करणाऱ्या शरद बनसोडे यांनाही उमेदवारीसाठी धडपड करावी लागत आहे. 2014 मध्ये काँग्रेसचा गड भाजपने जिंकला सोलापूर लोकसभा हा तसा काँग्रेसचा गड […]

सोलापूर मतदारसंघात भाजपचे दोन खासदार विरुद्ध जयसिद्धेश्वर महास्वामी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

सोलापूर: निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक 2019 चा कार्यक्रम जाहीर केला. मात्र इकडे सोलापूर लोकसभा मतदार संघात भाजपच्या उमेदवारीसाठी धडपड सुरु आहे. विशेष म्हणजे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत काँग्रेसच्या दिग्गज सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव करणाऱ्या शरद बनसोडे यांनाही उमेदवारीसाठी धडपड करावी लागत आहे.

2014 मध्ये काँग्रेसचा गड भाजपने जिंकला

सोलापूर लोकसभा हा तसा काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जातो. मात्र 2014 च्या मोदी लाटेत काँग्रेसचा बुरुज ढासळला आणि हा मतदारसंघ भाजपकडे आला. नवखे असलेल्या शरद बनसोडे यांचा तब्बल दीड लाख मतांनी विजय झाला. मात्र शरद बनसोडे यांचा मतदारसंघात म्हणावा तितका वावर आणि सुमार कामगिरी यामुळे लोकांमध्ये जशी बनसोडे यांच्यावर नाराजी आहे तशीच पक्षाचीसुद्धा नाराजी आहे.

काँग्रेसच्या चाळीस वर्षाच्या गडावर मिळवलेला विजय भाजपाला यंदाच्या निवडणुकीतसुद्धा कायम ठेवायचा आहे. त्यामुळे बनसोडे यांच्याऐवजी दुसरा उमेदवार देण्याच्या हालचाली गेल्या आठ- दहा महिन्यापासून सुरु झाल्या आहेत.

अमर साबळेंकडून चाचपणी

सोलापूर लोकसभा मतदार संघाचे संभाव्य उमेदवार म्हणून राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी सोलापूर लोकसभा मतदार संघात गेल्या सहा महिन्यापासून वावर सुरु ठेवला आहे. मात्र उमेदवारीबाबत काहीच हालचाली होत नसल्यामुळे, त्यांनी सध्या दिल्ल्लीत तळ ठोकून ठेवला आहे. अमर साबळे हे सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक आहेत. मात्र त्यांनी मतदारसंघात पक्षाचा आढावा घेणे सोडून, आपल्या उमेदवारीसाठी दिल्लीतला मुक्काम वाढवला आहे.

शरद बनसोडेंचा दावा

तर दुसरीकडे विद्यमान शरद बनसोडे हे सुद्धा पुन्हा एकदा उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. आपण मतदार संघातील गाव न् गाव पिंजून काढलंय त्यामुळे आपणच उमेदवार असल्याचं बनसोडे छातीठोकपणे सांगत आहेत. त्यासाठीच त्यांनी दिल्ली दरबाराऐवजी थेट मुख्यमंत्र्यांच्या मनधरणीसाठी मुंबईत आपला मुक्काम वाढवला आहे.

डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामींची फिल्डिंग

या दोन खासदारांच्या स्पर्धा सुरु असताना, बाहरेचा उमदेवार अमर साबळे नकोच अशी भूमिका घेत पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी बेडा जंगम समाजातील डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामींचे नाव उमेदवारीसाठी पुढे केले आहे. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामींनीही उमेदवारीसाठी पालकमंत्री विजय देशमुखांसोबत मुंबई वाऱ्या केल्या आहेत. शिवाय त्यांनी इकडे सोलापुरात भक्त आणि भाजपच्या कार्यकर्त्याबरोबर बैठकीचं सत्र सुरू आहे. तर अनेक कार्यक्रमांना हजेरीसुद्धा लावत आहेत. त्यामुळे दोन खासदार आणि एका महाराज  अशी स्पर्धा लागली आहे. मात्र या तिघांत ऐनवेळी कोणाची वर्णी लागेल हे येत्या काळात स्पष्ट होईल.

‘बाहेरचा उमेदवार नको’

तिघांत स्पर्धा सुरु असली तरी आपणच कसे मतदारसंघात सरस आहोत हे पक्षश्रेष्टींना पटवून सांगितलं जात आहे. सहा महिन्यापूर्वी  शरद बनसोडे यांच्या सुमार कामगिरीमुळे दिल्ली येथील पक्षश्रेष्ठेंनी खासदार अमर साबळे यांच्या उमेदवारीबाबत हिरवा कंदील दाखवला होता. त्यामुळे साबळे यांनी सोलापूर मतदारसंघातील राबता वाढवला होता. मात्र त्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुखांनी विशेष मेहनत घेतली होती. मात्र ऐन निवडणूक जाहीर होण्याच्या काही दिवस आधी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी बाहेरचा उमेदवार नको हा हट्ट धरत मतदारसंघातील जातीचे समीकरण पाहून डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामीजींचे नाव पुढे घेऊन त्यांच्या नावाचा आग्रह धरला आहे, आणि तशी तयारी सुद्धा सुरू केली.

मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील?

विशेष म्हणजे पालकमंत्र्यांच्या या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिल्याची माहिती आहे. त्यामुळे या स्पर्धेतून बाहेर पडतो की काय म्हणून खासदार अमर साबळे यांनी दिल्ली दरबारी जोर लावला. मोदींचा प्रभाव चांगला असून आपण निवडून येऊ शकतो असा खासदार अमर साबळे यांना आपला आत्मविश्वास आहे.

महाराजांच्या बैठका

भाजपच्या दिल्लीतील हायकमांडकडून उमेदवारीस हिरवा कंदील मिळाल्याने खासदार साबळे सोलापुरात विविध उपक्रम, कार्यक्रम राबवत होते. पण, त्यांची अडचण झाली आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे महाराजांना उमेदवारी मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांमार्फत प्रयत्नशील आहेत. हिरवा कंदीलही मिळाल्याचे सांगण्यात आले. पण भक्तांना विचारले पाहिजे, ही औपचारिक भूमिका असल्याचे चर्चेतून स्पष्ट होते. सोलापूरसह अक्कलकोट येथे महाराजांनी भक्तांची बैठक घेतली. अक्कलकोट, शहर उत्तर व दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघात लिंगायत समाज व महाराजांना मानणारा वर्ग असल्याने त्यांची निवडणूक या तीन विधानसभा मतदार संघावर अवलंबून आहे. श्री. साबळे यांनी दिल्ली गाठली आहे. मतदार संघाचा दौरा कमी झाला. मोदी प्रभावामुळे आपण सोलापूर लोकसभा मतदारसंघात निवडून येऊ शकतो असा आत्मविश्वास साबळे यांना आहे, तर विद्यमान खासदार शरद बनसोडे यांनी डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या जात प्रमाणपत्रावर अस प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

शरद बनसोडे यांनी आरक्षित जागेवर लिंगायत समाजाचा धर्मगुरूंना उमेदवारी दिली तर दलित समाज नाराज होईल त्यामुळे महाराजांना विरोध करत पुन्हा एकदा आपल्यालाच उमेदवारी हवी अशी मागणी केली आहे, गेल्या पाच वर्षातील बनसोडे यांची मतदारसंघातली कामगिरी पाहता काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्यासमोर शरद बनसोडे हे प्रबळ दावेदार होऊ शकत नाहीत ,त्यामुळे शिंदे यांना दोन हात करायचे असेल तर डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामीजी हेच प्रबळ दावेदार होऊ शकतील असा सूर दस्तरखुद्द पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि त्यांच्या समर्थकांनी आवळला आहे.

प्रत्येक जण आपापल्या परीने आपली उमेदवारी कसे मिळवता येईल यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, या प्रयत्नात कोण बाजी मारेल हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.