‘वंचित’ने भाजपची सुपारी घेतली, सुशीलकुमार शिंदेंचा हल्लाबोल
सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्यात द्वंद्व रंगलं आहे. सुशीलकुमार शिंदेंनी आज प्रकाश आंबेडकरांवर टीकास्त्र सोडलं. काँग्रेसची मतं कापून भाजपला फायदा मिळावा अशी सुपारी वंचित बहुजन आघाडीने घेतली आहे, असा घणाघात सुशीलकुमार शिंदेंनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. एमआयएमसोबत एकत्रित येताना तुमची […]
सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्यात द्वंद्व रंगलं आहे. सुशीलकुमार शिंदेंनी आज प्रकाश आंबेडकरांवर टीकास्त्र सोडलं.
काँग्रेसची मतं कापून भाजपला फायदा मिळावा अशी सुपारी वंचित बहुजन आघाडीने घेतली आहे, असा घणाघात सुशीलकुमार शिंदेंनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते.
एमआयएमसोबत एकत्रित येताना तुमची तत्वं कुठे गेली? असा सवाल सुशीलकुमार शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांना विचारला. वंचित बहुजन आघाडी म्हणजे ‘वोट कटवा’ आघाडी असल्याची टीका त्यांनी केली.
वाचा : सुशीलकुमार शिंदे प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला
दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी सुशीलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली. ही अनपेक्षित भेट असल्याचा दावा काँग्रेसने केला होता. सुशीलकुमार शिंदे हे शिवराज पाटील चाकूरकर यांना भेटण्यासाठी गेल्यानंतर, प्रकाश आंबेडकर यांची भेट झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. मात्र आंबेडकर आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या भेटीने सोलापूर शहरात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
काँग्रेस गाढवांचा पक्ष : प्रकाश आंबेडकर
या भेटीनंतर प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवर तुफान टीका केली होती. “काँग्रेस हा गाढवांचा पक्ष आहे. भेटीचे राजकारण करणं हे काँग्रेसवाल्यांना जमतं. निवडणूक म्हणजे दुश्मनी असं मी कधीच मानलं नाही. कुणाला तरी भेटायचे आणि फोटो व्हायरल करायचे, हे काँग्रेसचे डावपेच आहेत.”, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.
सोलापुरात काँटे की टक्कर
2014 साली सोलापूर लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर, पुन्हा एकदा काँग्रेसने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. 2014 साली मोदीलाटेमुळे शिंदेंना पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, सोलापूरची जागा काँग्रेसची हक्काची जागा मानली जाते. मात्र, यावेळी सुशीलकुमार शिंदे यांच्यासमोर वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर आणि भाजपकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे आव्हान असल्याने सोलापूरची लढत रंगतदार होणार, हे निश्चित.
माझी शेवटची निवडणूक – सुशीलकुमार
माझी शेवटची निवडणूक आहे. शेवटच्या निवडणुकीत मला शरद पवारांची साथ हवीय, असे भावनिक आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच केलं होतं. सोलापुरात आयोजित काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीच्या निर्धार मेळाव्यात सुशीलकुमार शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हेही उपस्थित होते.
संबंधित बातम्या
अकोल्यातल्या माणसाचं सोलापुरात काय काम? : प्रणिती शिंदे
सुशीलकुमार शिंदेंसोबतच्या भेटीवर अखेर प्रकाश आंबेडकरांनी मौन सोडलं!