सोलापूर महापालिकेत महाविकास आघाडीची रणनीती, महापौर आमचाच, प्रणिती शिंदेंचा दावा

भाजपला हटवण्यासाठी एकत्र आलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाविकास आघाडी बनवून, राज्यात सरकार स्थापन केलं. आता हीच महाविकास आघाडी महापालिकांमध्येही (Solapur Mayor Election) सत्तास्थापन्याच्या तयारीत आहे.

सोलापूर महापालिकेत महाविकास आघाडीची रणनीती, महापौर आमचाच, प्रणिती शिंदेंचा दावा
Follow us
| Updated on: Dec 03, 2019 | 3:45 PM

सोलापूर : भाजपला हटवण्यासाठी एकत्र आलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाविकास आघाडी बनवून, राज्यात सरकार स्थापन केलं. आता हीच महाविकास आघाडी महापालिकांमध्येही (Solapur Mayor Election) सत्तास्थापन्याच्या तयारीत आहे. महाविकास आघाडीचा हा फॉर्म्युला सोलापूर महानगरपालिकेत (Solapur Mayor Election)  अमलात आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

बहुमतात असणाऱ्या भाजपला दूर ठेण्यासाठी महानगरपालिकेतील काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आहेत. 102 जागा जागा असलेल्या महानगरपालिकेत भाजपचे 49 नगरसेवक आहेत. तर शिवसेनेचे 21, काँग्रेसचे 14 राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक आहेत. माकपकडे 1, अपक्ष आणि इतर 4  आणि एमआयएमचे 8  नगरसेवक आहेत.

त्यामुळे आकडेवारीचे गणित लक्षात घेता भाजप बहुमतात असले तरी महाविकास आघाडीला एमआयएमची साथ लाभली तर महाविकास आघडीच्या महापौरपदाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी भाजपविरोधातील सर्व पक्षीयांना एकत्र यावं लागेल.

काँगेस आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर महानगरपालिकेत महाविकास आघाडीचा महापौर होणार असल्याचा दावा केला आहे. सोलापूर महानगरपालिकेसाठी उद्या महापौरपदाची निवड होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार प्रणिती शिंदे यांनी हा दावा केला.

सोलापूर महापालिका पक्षीय बलाबल • भाजप 49 • शिवसेना 21, • काँग्रेस 14 • राष्ट्रवादी 04 • MIM – 08 • माकप – 01 • अपक्ष/इतर – 04 • रिक्त – 01 • एकूण = 102

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.