दाल में कुछ काला है! समीर वानखेडे भाजपची पोलखोल करू शकतात; नाना पटोलेंचे गंभीर आरोप

Nana Patole on Sameer Wankhede : समीर वानखेडे यांच्याकडे भाजप आणि RSS ची पोलखोल करू शकतील असे पुरावे; नाना पटोले यांचे गंभीर आरोप

दाल में कुछ काला है! समीर वानखेडे भाजपची पोलखोल करू शकतात; नाना पटोलेंचे गंभीर आरोप
Follow us
| Updated on: May 22, 2023 | 11:43 AM

सोलापूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. समीर वानखेडे यांची सध्या सीबीआय चौकशी होतेय. आर्यन खान प्रकरणात त्यांची ही चौकशी होत आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी वानखेडे यांचा भाजपशी संबंध असल्याचं म्हटलं आहे.

समीर वानखेडे यांच्या चौकशी मागे दाल में जरुर कुछ काला है!, वानखेडेंजवळ भाजप आणि संघाची पोलखोल करू शकतो अशा काही वस्तू आहेत, असं नाना पटोले म्हणालेत.

समीर वानखेडे हे संघाच्या मुख्यालयात जाऊन संघप्रमुखांना भेटून आले. त्यानंतर त्यांच्या मागे चौकशीचा ससेमेरा लागला. यामध्ये काहीतरी दाल में काला है! भाजपचे राज्यातील नेते म्हणत होते की समीर वानखेडे यांच्या केसाला धक्का लागला तरी आम्ही पाहून घेऊ. आता CBI आणि ED हे केंद्र सरकारचे दोन बंदर बनले आहेत. यातील सीबीआय हे समीर वानखेडेची चौकशी करत आहे. आता भाजपचे हे लोक कुठे गेले?, असा सवाल पटोलेंनी उपस्थित केलाय.

समीर वानखेडेंबाबत असं काय घडलं की, मोहन भागवतांना भेटल्यानंतर चौकशीचा ससेमिरा मागे का लागला. यामध्ये काही ना काही गोष्टी समोर येतील. यामध्ये काही ना काही लपलेलं आहे. काही गोष्टी संशयास्पद आहेत, असं पटोले म्हणालेत.

वानखेडेंजवळ भाजप आणि संघाची पोलखोल करू शकतो अशा काही वस्तू आहेत. त्यामुळे त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागलाय का असा एक प्रश्न आहे? संघ मुख्यालयात गेल्यानंतरच त्यांच्यावर चौकशीचा ससेमीरा लागणं या प्रश्नाची उकल होणं महत्त्वाचं आहे, असं म्हणत नाना पटोलं यांनी वानखेडेंच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

प्रत्येक पक्षाने चाचणी केलीच पाहिजे मात्र जागा वाटपाचा निर्णय हा मेरिटवर होणार आहे. मविआतील ज्या पक्षाचे मेरिट जेथे असेल त्याप्रमाणे तिथले निर्णय होतील. पारंपारिक मतदार संघ हा विषय वेगळा आहे. वेळेप्रमाणे काही गोष्टी बदलल्या जातात. जागा वाटपाबाबत आम्ही काही कमिट्या तयार केलेत त्यात मेरिटच्या आधारावर चर्चा होईल, असं पटोले म्हणालेत.

महाराष्ट्र हा परंपरागत काँग्रेसचा राहिलेला आहे. आमच्या पासून काही जन्माला आलेली लोक वेगळी आहेत पण महाराष्ट्र हा परंपरागत काँग्रेसचा राहिलेला आहे. विदर्भात तर फक्त काँग्रेसच आहे त्यामुळे आज अशा चर्चा करण्याची वेळ नाही. माढा मतदारसंघात काँग्रेस आपली संघटनात्मक बांधणी करणारच आहे. प्रत्येक पक्षाला तो अधिकार आहे, असं म्हणत आगामी निवडणुकांवरही पटोलेंनी भाष्य केलं आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.