महाराष्ट्रानं ओवाळून टाकलेली घाण म्हणजे राणे कुटुंबीय; ठाकरे गटाच्या नेत्याची जोरदार टीका

| Updated on: May 16, 2023 | 5:19 PM

Sharad Koli on Narayan Rane : आधी नितेश आणि नारायण राणेंची नार्कोटेस्ट करा, मग उद्धव ठाकरेंची; ठाकरे गटाच्या नेत्याची मागणी

महाराष्ट्रानं ओवाळून टाकलेली घाण म्हणजे राणे कुटुंबीय; ठाकरे गटाच्या नेत्याची जोरदार टीका
Follow us on

सोलापूर : ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपचे नेते नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे. खरंतर सगळ्या महाराष्ट्रानं ओवाळून टाकलेली घाण म्हणजे राणे कुटुंबीय आहे. राणे तुम्ही राज्यातल्या राज्यकर्त्यांच्या आणि पक्षाच्या दरवाज्यात जाऊन भिक मागत, जोगवा मागत फिरणारं कुटुंब आहात, असं शरद कोळी म्हणालेत.

अंकुश राणे हत्या प्रकरणी नितेश आणि नारायण राणेंची नार्कोटेस्ट करा मग उद्धव ठाकरेंची टेस्ट करा. नितेश राणेंची झोप उडाली आहे. भाजपने नितेश राणे यांच्यावर महाराष्ट्रातील युवकांची डोके भडकवून, महाराष्ट्रात दंगे भडकवण्याची सुपारी दिलीय, असा गंभीर आरोप शरद कोळी यांनी केला आहे.

कर्नाटकातील जनतेने भाजपला मुळासकट उपटून फेकलं आहे. महाराष्ट्रातही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. हे भाजपला कळून चुकलं आहे. त्यामुळे भाजपवाल्यांची गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेत्यांची पायाखालील वाळू सरकली आहे, असं म्हणत त्यांनी भाजपवर टीकास्त्र डागलंय.

अंकुश राणे यांच्या खून प्रकरणात नितेश राणे आणि नारायण राणे यांची नार्कोटेस्ट करावी. नेमकं काय घडलं होतं. कसा प्लॅन केला आहे हे समोर यावं. या प्रकरणातील सत्य लोकांसमोर यावं, अशी मागणी मी करतो, असं शरद कोळींनी म्हटलं आहे.

संजय राऊत शिवसेना ठाकरे गटासोबत आणि उद्धवसाहेबांसोबत एकनिष्ठ आहेत. तुमच्यासारखं दारोदारी जोगवा मागणारी अवलाद संजय राऊताची कधीच नाही. तुम्ही काय आहे ते तुम्ही बघा. जोगवा मागण्या शिवाय तुम्हाला दुसरा पर्याय नाही. त्याशिवाय तुमचं पोटही भरत नाही, असंही शरद कोळी म्हणालेत.