“आम्ही गद्दार, गटारीतील घाण आहोत तर आम्हाला पुन्हा पक्षात कशाला बोलवताय?” शहाजी बापू पाटलांचा आदित्य ठाकरेंना सवाल

शहाजी बापू पाटलांनी आपल्या रोखठोक भाषेत शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांना परखड सवाल विचारला आहे.

आम्ही गद्दार, गटारीतील घाण आहोत तर आम्हाला पुन्हा पक्षात कशाला बोलवताय? शहाजी बापू पाटलांचा आदित्य ठाकरेंना सवाल
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 2:22 PM

सोलापूर : आपल्या बिंधास्त बोलण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या शहाजी बापू पाटलांनी आपल्या रोखठोक भाषेत शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना परखड सवाल विचारला आहे. “आम्ही गद्दार, गटारीतील घाण आहे, तर आम्हाला पुन्हा पक्षात कशाला बोलवताय?” असा प्रश्न त्यांनी विचारलाय. “आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा काढली आहे त्या माध्यमातून ते आम्हाला खूप टाकून बोलत आहेत, आम्हाला अपमानित करत आहेत. त्यामुळे शिंदे गटातील आमदार दुखावले जात आहेत. आम्हाला थेट गद्दार म्हणणं योग्य नाही. उलट आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जात आहोत. लोकांच्य मनातील भावनेचा आदर करत आम्ही भाजपसोबत जात आहोत. त्यामुळे आम्ही काही चुकीचं करत आहोत, असं वाटत नाही, जनता आमच्या बाजूने आहे”, असं शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) म्हणाले आहेत.

मग आम्हाला परत का बोलावता?

सांगोल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटलांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. “आम्ही गद्दार, गटारीची घाण आहे तर आम्हाला पक्षात कशाला बोलवताय, असं ते म्हणालेत. आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा काढली आहे. त्या माध्यमातून ते आम्हाला खूप टाकून बोलत आहेत. सातत्याने आम्हाला गद्दार, गद्दार म्हणताहेत, गटार आहे वाहून जाऊ द्या म्हणत आहेत. मग ठीक आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही गद्दार आहोत, गटारीची घाण आहोत तर मग आम्हाला पक्षात पुन्हा, पुन्हा बोलवताय कशाला”, असं शहाजी बापू पाटील म्हणालेत.

हे सुद्धा वाचा

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

“महाविकास आघाडीच्या कामांना स्थगिती देणारं हे सरकार वैध आहे काय?”, असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय. ” स्वतःच्या काही गोष्टी आहेत जसे आता नवी मुंबईमध्ये आम्ही तिरुपती बालाजीचं मंदिर आणलेलं अयोध्येसाठी आम्ही मागणी केलेली यूपी सरकारकडे की तिथे महाराष्ट्र भवन व्हावं महाराष्ट्रात 10 मंदिर जी प्राचीन आहे त्याला आपण फंड दिलेलं पुन्हा दुसरी धाव घेत होतो आणि एक ठिकाणी मंदिर विकास असेल किंवा धार्मिक स्थळ असतील तर हे असं स्वतःला हिंदुत्ववादी सरकार म्हणत असेल तर ह्याची नक्की काय परिस्थिती आहे? काय स्थगिती दिली आहे की पुढे नेतात काम हा पण विचार करणे गरजेचे आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणालेत. ते सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. तिथे ते माध्यमांशी बोलत होते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.