राष्ट्रवादीविरोधात बंडखोरी केलेल्या मोहिते पाटील गटाच्या जिल्हा परिषद सदस्यांची जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर ही सुनावणी होणार आहे.

राष्ट्रवादीविरोधात बंडखोरी केलेल्या मोहिते पाटील गटाच्या जिल्हा परिषद सदस्यांची जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी
विजयसिंह मोहिते पाटील
Follow us
| Updated on: Nov 03, 2020 | 8:44 PM

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी करणाऱ्या माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील गटाच्या सहा जिल्हा परिषद सदस्यांची सुनावणी जिल्हाधिकाऱ्यांसमोर होणार आहे. (Solapur ZP members Mohite Patil group who rebelled against NCP Hearing in front of District Collector)

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर ही सुनावणी होणार आहे. येत्या मंगळवारी दुपारी 12 वाजता सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे.

माळशिरस तालुक्यातील मोहिते-पाटील गटाच्या 06 सदस्यांना अपात्र घोषित करावे अशी मागणी राष्ट्रवादीचे गटनेते बळीराम साठे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. याप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे सुनावणी सुरु असताना हा विषय उच्च न्यायालयात गेला होता. त्यानंतर सहा सदस्यांना तात्पुरता दिलासा मिळाला मात्र आता पुन्हा उच्च न्यायालयाने हा विषय जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवला आहे.

माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य स्वरुपाराणी मोहिते-पाटील , शितलादेवी मोहिते-पाटील, अरुण तोडकर, मंगल वाघमोडे ,सुनंदा फुले ,गणेश पाटील या सदस्यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी विरोधात बंडखोरी केली होती. त्यामुळे मोहिते पाटील गटाच्या या सहा जिल्हा परिषद सदस्यांना अपात्र करण्याची मागणी राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आली होती. आता न्यायालयाच्या आदेशानंतर या सदस्यांच्या संदर्भातली सुनावणी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात होणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत माळशिरस तालुक्यातील मोहिते-पाटील गटाच्या राष्ट्रवादीच्या सहा सदस्यांनी भाजप आणि समविचारी गटाला मतदान केलं होतं. त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेत महाविकासआघाडीचा प्रयत्न फसला आणि भाजप तसेच समविचारी गटाला अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद मिळालं. राष्ट्रवादीने या सहा सदस्यांनी पक्षाविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत पक्षातून हकालपट्टी केली होती. तर सदस्यत्व रद्द करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली होती आणि त्या संदर्भातली सुनावणी सुरु होती, या सुनावणीला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर ही सुनावणी होणार आहे.

(Solapur ZP members Mohite Patil group who rebelled against NCP Hearing in front of District Collector)

संबंधित बातम्या :

सोलापूर झेडपीत राष्ट्रवादीला धक्का, सहा सदस्यांच्या अपात्रतेच्या कारवाईला कोर्टाची स्थगिती

सोलापूर | राष्ट्रवादीविरोधात मतदान केलेल्या 6 जिल्हा परिषद सदस्यांचं निलंबन

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.