सोलापुरात राजकीय भूकंप होणार?, शिवसेनेच्या महेश कोठेंसह MIM चे तौफिक शेख राष्ट्रवादीच्या वाटेवर

सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजकीय भूकंप घडविला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (Solpur Shivsena and MIM leader May Join NCP)

सोलापुरात राजकीय भूकंप होणार?, शिवसेनेच्या महेश कोठेंसह MIM चे तौफिक शेख राष्ट्रवादीच्या वाटेवर
Follow us
| Updated on: Oct 06, 2020 | 9:56 AM

सोलापूर : सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजकीय भूकंप घडविला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सोलापूर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे आणि एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख हे दोघेही राष्ट्रवादीचे वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे. या दोन्ही नेत्यांचे पक्षप्रवेशामुळे येत्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी ताकद मिळणार आहे. तर काँग्रेस, शिवसेना, आणि बंडखोरी करत राष्ट्रवादीच्या वाटेवर असणाऱ्या महेश कोठेचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Solpur Shivsena and MIM leader May Join NCP)

महेश कोठे हे सध्या शिवसेनेत असून काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे  यांचे  निष्ठावंत असलेले स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांचे ते चिरंजीव आहेत. कोठे यांनी  2014  मध्ये काँग्रेसला रामराम करत  सोलापुरातील शहर मध्य मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात शिवसेनेकडून निवडणूक लढविली होती. तर 2019 मध्ये शिवसेनेने तिकीट नाकारल्याने शिवसेनेच्या विरोधात बंडखोरी करत शहर मध्य मतदारसंघातून काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढविली होती.

त्यामुळे महेश कोठे हे काँग्रेस, शिवसेना करत आता राष्ट्रवादीच्या वाटेवर आमदारकीचे स्वप्न सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करणार आहेत. यासाठी गेल्या दीड महिन्यापासून ते राष्ट्रवादी नेत्यांच्या संपर्कात आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली होती.

तर दुसरीकडे एमआयएमचे तौफिक शेख राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे  संकेत मिळत आहेत. या दोघांच्या पक्ष प्रवेशामुळे राष्ट्रवादीची महानगरपालिकेतील आणि पक्ष संघटनेची ताकद वाढणार असल्याचं राजकीय अभ्यासकांकडून बोलले जात आहे. त्यासाठी रणनीतीही आखली जात आहे.

तौफिक शेख यांनीही सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदेंविरोधात निवडणूक लढवली होती. यात प्रणिती शिंदे आणि तौफीक शेख यांच्यात चांगली लढत झाली होती. सोलापूर शहर मध्य हा मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे. 2014 ला झालेल्या पराभवाचा वचपा करण्यासाठी तौफिक शेख यांनी यंदाच्या विधानसभेसाठी तयारी केली होती.  (Solpur Shivsena and MIM leader May Join NCP)

मात्र कर्नाटकातील काँग्रेस नेत्या रेश्मा पडकनूर यांच्या खुनाच्या आरोपाखाली त्यांना तुरुंगात जावे लागले होते. त्यामुळे त्यांना यंदाची विधानसभा निवडणूक लढविता आली नाही. त्यांना तुरुंगातूनच शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून एमआयएमकडून निवडणुकीच्या  रिंगणात उतरायचे होते. मात्र ऐनवेळी पक्षाने फारुक शादी यांना निवडणूक रिंगणात उतरवले.

सोलापूर शहरातील तीन जागांपैकी  शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ हे आघाडीच्या वाटेत राष्ट्रवादीकडे आहे. मात्र भाजपचा वळ म्हणून ओळखल्या जाणार्‍या या मतदारसंघात आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसला  विजयाची आघाडी घेता आलेली नाही. यंदा राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवत शिवसेना, राष्ट्रवादी, आणि काँग्रेस यांनी आघाडी करत सत्तेत आरुढ  झाले आहेत.

मात्र येत्या काळात शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ ढासळण्याची राष्ट्रवादीची रणनीती सुरु आहे. तर दुसरीकडे या मतदारसंघात असलेल्या मोठ्या प्रमाणातील मुस्लिम मते आणि एमआयएमची असलेली ताकद ही राष्ट्रवादी काँग्रेस हेरणार आहे.

? कोण आहेत महेश कोठे?

  • महेश कोठे  सध्या सोलापूर महानगरपालिकेचे शिवसेनेचे विरोधी पक्षनेते आहेत
  • आमदार प्रणिती शिंदे यांचे कट्टर राजकीय विरोधक
  • सुशीलकुमार शिंदे यांचे निष्ठावंत असलेल्या विष्णुपंत कोठे यांचे चिरंजीव
  • 2014 मध्ये काँग्रेसला रामराम करत प्रणिती शिंदे यांच्याविरोधात सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडणूक लढवली.
  • 2019 ला शिवसेनेने तिकीट नाकारल्यामुळे बंडखोरी करत शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली.
  • महेश कोठे यांना 21 नगरसेवकांपैकी शिवसेनेच्या 19 नगरसेवकांचा पाठिंबा
  • महेश कोठे यांचा राष्ट्रवादीत पक्षाचा प्रवेश झाला, तर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार

? कोण आहेत तौफीक शेख?

  • तौफीक शेख हे एमआयएमचे नगरसेवक आहेत.
  • तौफीक शेख हे महेश कोठेचे समर्थक आहे.
  • कोठेंनी काँग्रेस सोडल्यावर तौफिक यांनी एमआयएमची वाट धरली
  • काँग्रेसला रामराम करत एमआयएम कडून 2014 साली  शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
  • आमदार प्रणिती शिंदे आणि तौफिक यांच्यात अटीतटीची लढत झाली होती.
  • सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ मोठ्या प्रमाणात मुस्लिम बहुल असल्याने शेख यांना मानणारा वर्ग मोठा
  •  एमआयएमचे सध्या सोलापुरात 8 नगरसेवक  (Solpur Shivsena and MIM leader May Join NCP)

संबंधित बातम्या : 

नवी मुंबईत हाथरस घटनेच्या निषेधार्थ कॉंग्रेसचे पाण्यात उतरुन सत्याग्रह आंदोलन

दानवे किती रस्त्यावर असतात, हे माहीत आहे, बाळासाहेब थोरातांचा टोला

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.