Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरेंचं पत्र मिळालं, संधी मिळाल्यास सेनेचे नेतेही मन मोकळं करतील : देवेंद्र फडणवीस

ज्या भागात अशाप्रकारचे तेलशुद्धीकरण प्रकल्प असतात तेथील उत्पन्न वाढते. गुजरातमध्ये ही बाब सिद्ध झाली आहे. | Devendra Fadnavis

राज ठाकरेंचं पत्र मिळालं, संधी मिळाल्यास सेनेचे नेतेही मन मोकळं करतील : देवेंद्र फडणवीस
ज्या भागात अशाप्रकारचे तेलशुद्धीकरण प्रकल्प असतात तेथील उत्पन्न वाढते. गुजरातमध्ये ही बाब सिद्ध झाली आहे. आर्थिक उलाढाल वाढल्याशिवाय रोजगार वाढवणे शक्य नाही.
Follow us
| Updated on: Mar 08, 2021 | 11:29 AM

मुंबई: शिवसेनेच्या काही नेत्यांना मोकळेपणाने बोलायची संधी दिली तर तेदेखील नाणार प्रकल्पाला पाठिंबा देतील, असे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. नाणार प्रकल्पाचा निवडणुकीशी कोणताही संबंध नाही. राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाबाबत (Nanar refinery project ) घेतलेली भूमिका योग्य असून आम्ही त्याचे स्वागत करतो, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. (Devendra Fadnavis on Nanar refinery project)

ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी रत्नागिरीच्या नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाचे पूर्णपणे समर्थन केले. मला राज ठाकरे यांचे पत्र मिळाले आहे. त्यांची भूमिका अगदी योग्य आहे. अनिल काकोडकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर सर्व शंका संपल्या आहेत. ते या प्रकल्पाची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यासाठी मदत करणार आहेत. ही ग्रीन रिफायनरी आहे, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

गुजरातमध्ये प्रकल्पामुळे उत्पन्न वाढले: फडणवीस

ज्या भागात अशाप्रकारचे तेलशुद्धीकरण प्रकल्प असतात तेथील उत्पन्न वाढते. गुजरातमध्ये ही बाब सिद्ध झाली आहे. आर्थिक उलाढाल वाढल्याशिवाय रोजगार वाढवणे शक्य नाही. नाणार रिफायनरी ही राज्यातील सर्वात मोठी गुंतवणूक असणार आहे. याचा निवडणुकीशी कोणताही संबंध नाही. लोकांचा पाठिंबा असेल तर आम्ही या प्रकल्पासाठी तयार आहोत, असे शिवसेना म्हणते. मुळात लोक मोठ्याप्रमाणावर या प्रकल्पासाठी जमिनी देण्यासाठी तयार आहेत. शिवसेनेच्या अनेक नेत्यांना मोकळेपणाने बोलायची संधी दिल्यास ते या प्रकल्पाचे समर्थनच करतील, असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

‘नाणार प्रोजेक्ट’ आता कृष्णकुंजवर; प्रकल्पग्रस्त राज ठाकरेंच्या भेटीला

मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पुढाकारामुळे आता रत्नागिरीच्या नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाचा (Nanar Refinery Project) मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कालच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाणार प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाऊन देऊ नका, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे राज्य सरकारने गुंडाळलेल्या नाणार प्रकल्पाची फाईल पुन्हा उघडणार असल्याची चर्चा आहे.

या पार्श्वभूमीवर सोमवारी नाणारमधील काही प्रकल्पग्रस्त राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. राज ठाकरे यांच्या मुंबईतील कृष्णकुंज या निवासस्थानी ही बैठक पार पडेल.

नाणार पंचक्रोशीतील जवळपास 100 प्रकल्पग्रस्त राज ठाकरे यांची भेट घेतील. यापैकी बहुतांश जण हे जमीन मालक आहेत. याशिवाय, नाणार रिफायनरी प्रकल्प समर्थन समन्वय समितीचे अध्यक्षही या बैठकीला उपस्थित राहतील. यावेळी राज ठाकरे यांच्यापुढे नाणारमधील तब्बल 8500 जमीन मालकांची संमतीपत्रेही सादर करण्यात येतील. त्यामुळे आता राज ठाकरे नाणारच्या मुद्द्यावरुन आक्रमक होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

संबंधित बातम्या:

‘नाणार प्रकल्प’ हातातून गमावू नका, राज्याला परवडणार नाही; राज ठाकरेंचं उद्धव ठाकरे, शरद पवार, फडणवीसांना पत्रं

नाणारमध्ये 221 गुजराती भूमाफियांच्या जमिनी; राज ठाकरेंचं अचानक मनपरिवर्तन कसं झालं: विनायक राऊत

हिंमत असेल तर राज यांनी नाणारवासियांसमोर भूमिका मांडावी; शिवसेनेचं आव्हान

(Devendra Fadnavis on Nanar refinery project)

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.