Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ताईंनी शब्दच असा दिलाय, ‘या’ ग्रामपंचायतीची चर्चा होणारच! जाहिरनाम्यावर कोणता शिक्का?

येत्या 18 डिसेंबर ला होणाऱ्या 8 सदस्यीय (7+1) सोमनाळा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीच्या रणसंग्रामात त्यांनी उडी घेतली आहे.

ताईंनी शब्दच असा दिलाय, 'या' ग्रामपंचायतीची चर्चा होणारच! जाहिरनाम्यावर कोणता शिक्का?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 13, 2022 | 1:31 PM

भंडाराः आपला नेता (Leader)शब्दाला जागणारा असावा, अशी प्रत्येक नागरिकाची इच्छा असते. पण फार कमी नेते निवडणुकांदरम्यान (Election) दिलेली आश्वासनं पाळतात. आपला शब्द खरा करून दाखवतात. अनेकांना तर प्रचारादरम्यान, आपण काय काय बोललो हेही आठवत नाही. त्यामुळे नेत्यांची आश्वासनं कितपत मनावर घ्यायची, अशी स्थिती गावा-गावांत निर्माण झाली आहे.

लोकांची मनं जाणणाऱ्या एका महिला नेत्याने यावर उत्तम तोडगा काढलाय. त्या निवडणुकीत उतरल्यात, मतदारांना शब्दही दिलाय आणि तो खरा करून दाखवणार, यासाठी एक पुरावाही दिलाय. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. या धुरळ्यात भंडाऱ्याच्या एका ग्रामपंचायतीची यासाठीच चर्चा आहे. इथल्या महिला सरपंचाने जाहिरनामा दिलाय तो १०० रुपयांच्या स्टँप पेपरवर…

येत्या 18 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील सोमनाळा गावातील सरपंच पदाच्या महिला उमेदवार छबु वंजारी यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा नवा फंडा वापरला आहे.

या नेत्याचं शिक्षणही चांगलंच झालंय. बी एस्सी,एम एस डब्लू.. .येत्या 18 डिसेंबर ला होणाऱ्या 8 सदस्यीय (7+1) सोमनाळा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीच्या रणसंग्रामात त्यांनी उडी घेतली आहे.

गावात स्थानिक पातळी वरील दिग्गज स्थानिक नेते आहेत. 1200 लोकसंख्या असलेल्या मतदारांना आपण वेगळं काय द्यायचं, याचा विचार त्यांनी केला. अन् जाहिरनामा 100 रूपयांच्या स्टैम्प पेपर वर लिहून दिला आहे.. छबू ताई एवढ्यावर थांबल्या नाहीत… त्यांनी चक्क त्याला नोटरी करत शासकीय अधिकृतता मिळवून दिली आहे. हा जाहिरनामा दोन पानांचा आहे. आपण निवडून आलो तर जाहिरनामा खरा करून दाखवणं आपल्याला बंधनकारक असणार असल्याचं या ताई सांगत आहेत.

या जाहिरनाम्यातील आश्वासनं फक्त आपणच नाही तर संपूर्ण पॅनलकडून पाळली जातील, असंही छबूताईंनी म्हटलंय. गावकऱ्यांना हा नोटरी केलेला जाहिरनामा आकर्षित करत आहे. पहिल्यांदा असा जाहिरनामा पहिल्याचे गावकरी सांगत आहेत. निवडणूक प्रचाराच्या बदलत्या स्वरूपाचं कौतुकही गावकरी करीत आहेत.

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.