सोनिया गांधींची काँग्रेसच्या संसदीय नेतेपदी निवड
नवी दिल्ली : संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (UPA) प्रमुख सोनिया गांधी यांची सलग चौथ्यांदा काँग्रेसच्या संसदीय नेतेपदी निवड झाली आहे. आज (1 जून) झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या खासदारांनी एकमताने हा निर्णय घेतला. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत सोनिया गांधींच्या निवडीबाबत माहिती दिली. संसदीय नेतेपदी निवड झाल्यानंतर सोनिया गांधी म्हणाल्या, “काँग्रेसवर विश्वास दाखवलेल्या 12.13 कोटी मतदारांचे आम्ही […]
नवी दिल्ली : संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (UPA) प्रमुख सोनिया गांधी यांची सलग चौथ्यांदा काँग्रेसच्या संसदीय नेतेपदी निवड झाली आहे. आज (1 जून) झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या खासदारांनी एकमताने हा निर्णय घेतला.
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत सोनिया गांधींच्या निवडीबाबत माहिती दिली. संसदीय नेतेपदी निवड झाल्यानंतर सोनिया गांधी म्हणाल्या, “काँग्रेसवर विश्वास दाखवलेल्या 12.13 कोटी मतदारांचे आम्ही आभार मानतो.” काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही मतदारांचे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचे आभार मानले. राहुल गांधी म्हणाले, “काँग्रेसच्या प्रत्येक सदस्याने लक्षात ठेवावे की आपल्यापैकी प्रत्येकजण संविधानासाठी, भारतातील प्रत्येक व्यक्तीसाठी लढत आहे. यात त्या व्यक्तीचा रंग, त्वचा किंवा श्रद्धा यांना काहीही महत्त्व नाही.”
आपण 52 खासदार असून भाजपविरोधातील एक-एक इंचाची लढाई लढणार आहोत याचा मला विश्वास आहे. आपण भाजपचा सामना करण्यासाठी पुरेसे आहोत. त्यांनी आपल्याशी लढण्यासाठी राग आणि द्वेषाचा उपयोग केला. आपल्यालाही आक्रमक व्हावे लागेल. ही वेळ आत्मचिंतन करुन पक्षाला पुन्हा एकदा उभारी देण्याची आहे, असेही राहुल गांधींनी नमूद केले.