Sonia Gandhi : ईडीसमोर सोनिया गांधींचा खळबळजनक खुलासा, राहुल गांधी यांच्यानंतर सोनिया यांनीही घेतलं मोतीलाल व्होरा यांचं नाव!

यावेळी सोनिया गांधींनी राहुल यांच्याप्रमाणेच ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितले की या व्यवहारासंबंधीत सर्व प्रकरणे मोतीलाल व्होरा यांनी हातळली आहेत. मोतीलाल व्होरा यांचे 2020 मध्ये निधन झाले आहे.

Sonia Gandhi : ईडीसमोर सोनिया गांधींचा खळबळजनक खुलासा, राहुल गांधी यांच्यानंतर सोनिया यांनीही घेतलं मोतीलाल व्होरा यांचं नाव!
ईडीसमोर सोनिया गांधींचा खळबळजनक खुलासा, राहुल गांधी यांच्यानंतर सोनिया यांनीही घेतलं मोतीलाल व्होरा यांचं नाव!
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 8:41 PM

नवी दिल्ल : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या ईडी चौकशीवरून सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात (National Herald Case) अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची तीन दिवस चौकशी केली. सुत्रांनी दिलेल्या विश्वसनीय माहितीनुसार चौकशीदरम्यान सोनियांनी राहुल गांधींनी जी उत्तरे दिली होती तशीच उतरं दिली आहेत. तपास यंत्रणांनी त्यांना असोसिएटेड जर्नल लिमिटेड (एजेएल) आणि यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यातील आर्थिक व्यवहारांबद्दल विचारले. यावेळी सोनिया गांधींनी राहुल यांच्याप्रमाणेच ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितले की या व्यवहारासंबंधीत सर्व प्रकरणे मोतीलाल व्होरा यांनी हातळली आहेत. मोतीलाल व्होरा यांचे 2020 मध्ये निधन झाले आहे. ते काँग्रेसचे सर्वात जास्त काळ कोषाध्यक्ष राहिले आहेत.

राहुल गांधी यांनीही हेच नाव घेतलं

ईडीच्या अधिकार्‍यांनी राहुल गांधींना आर्थिक पैलूंबाबत विचारणा केली असता, त्यांनी हे सर्व व्यवहार मोतीलाल व्होरा यांनी केल्याचेही सांगितले. राहुल आणि सोनिया गांधी यांच्याशिवाय काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि पवनकुमार बन्सल यांनीही ईडीला हेच उत्तर दिले आहे.

काँग्रेसने एकही पैसा काढला नाही

तपास यंत्रणेने जूनमध्ये राहुल गांधी यांची चौकशी केली होती. राहुल गांधी यांनी ईडीला सांगितले होते की यंग इंडियन ही नफा नसलेली कंपनी आहे, जी कंपनी कायद्याच्या विशेष तरतुदीनुसार सुरू करण्यात आली होती. याबाबत काँग्रेस नेत्यांनी सांगितले होते की त्यातून एक पैसाही काढला गेला नाही.

राहुल गांधींची पन्नास तास चौकशी

सोनिया गांधी यांची ईडीने दोन दिवसांत सुमारे 8 तास चौकशी केली. तपास यंत्रणेने राहुल यांच्याकडे यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडबाबत चौकशी केली होती. या कंपनीच्या माध्यमातून कोणाला आर्थिक लाभ झाला आहे का? असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. याच प्रकरणात राहुल गांधी यांची 5 दिवसांत सुमारे 50 तास चौकशी केली आहे.

काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडमधील आर्थिक अनियमिततेच्या आरोपावरून ईडीने राहुल आणि सोनिया गांधी यांच्यावर सध्या अनेक आरोप होत आहेत. काँग्रेसने त्या कंपनीच प्रचार केला, नॅशनल हेराल्डची मालकीही याच कंपनीकडे होती. अशाही काही बातम्या चर्चेत आल्या होत्या. तर दुसरीकडे देशभरातील काँग्रेस नेते या ईडी चौकशीविरोधात रस्त्यावर उतरत आहेत. काँग्रेसने अनेक ठिकाणी आक्रमक आंदोलनं केली आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.