‘सामना’नाट्यानंतर सोनू सूद ‘मातोश्री’वर, मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंची भेट
काँग्रेस नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्यासोबत सोनू सूदने 'मातोश्री'वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. (Sonu Sood meets CM Uddhav Thackeray Minister Aditya Thackeray at Matoshree)
मुंबई : अभिनेता सोनू सूदने परप्रांतीयांना आपापल्या घरी जाण्यास मदत केल्याच्या कामगिरीवर शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तून प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला. याची अखेर झाली ती सोनूच्या ‘मातोश्री’ भेटीने. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी सोनू ‘मातोश्री’वर पोहोचला होता. (Sonu Sood meets CM Uddhav Thackeray Minister Aditya Thackeray at Matoshree)
अभिनेता सोनू सूद काल (रविवार 7 जून) रात्री पावणेदहा वाजताच्या सुमारास ‘मातोश्री’वर गेला होता. काँग्रेस नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्यासोबत सोनूने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. जवळपास पाऊण तास त्यांची चर्चा झाली.
हेही वाचा : सोनू सूदवर ‘सामना’तील टीकेला भाजप-मनसेतून उत्तर, निरुपम यांच्याही कानपिचक्या
आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करुन याविषयी माहिती दिली. “सोनू सूद यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री अस्लम शेख यांच्यासह भेट घेतली. अनेकांच्या साथीने अनेकांच्या मदतीसाठी एकत्र आलो आहोत. एका चांगल्या व्यक्तीला भेटलो” अशा आशयाचे ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केले.
This evening @SonuSood met up with @CMOMaharashtra Uddhav Thackeray ji along with Minister @AslamShaikh_MLA ji and me. Better Together, Stronger Together to assist as many people through as many people. Good to have met a good soul to work for the people together. pic.twitter.com/NrSPJnoTQ6
— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 7, 2020
शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही सोनूला टोला लगावला.
अखेर सोनु सुद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रयांचा पत्ता सापडला.. मातोश्रीवर पोहोचले जय महाराष्ट्र
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 7, 2020
(Sonu Sood meets CM Uddhav Thackeray Minister Aditya Thackeray at Matoshree)
पहा व्हिडीओ :
सोनू सूदच्या कामगिरीवर ‘सामना’तून प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आल्यानंतर भाजप-मनसेसह काँग्रेस नेते संजय निरुपम यांनीही टीकेचे बाण सोडले होते.
‘कोरोना’वरुन लक्ष हटवण्यासाठी राजकीय आरोप होत असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली, तर भाजप नेते राम कदम यांनी संजय राऊत यांना ‘हाच आहे का तुमचा माणुसकीचा धर्म ?’ असा सवाल केला.
“मोठ्या मनाने सोनू सूदचा सन्मान करण्याऐवजी शिवसेना त्याच्यावर टीका करत आहेत. शिवसेना हा सत्ताधारी पक्ष आहे. मजुरांना मूळगावी परत पाठवण्याची परिस्थिती हाताळण्यात आलेले अपयशी लपवण्यासाठी त्यांनी या पातळीवर जाऊ नये” अशी टीका सत्तेत सहभागी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी ट्विटरवरुन केली होती.
“मा. संजय राऊत, या सगळ्यात आपण हा अग्रलेख लिहिण्यापलिकडे काय केलंत? ज्याने काम केलंय, त्याचं कौतुक करुया… मनाचा मोठेपणा दाखवुया… असो ‘रडण्या’पलिकडे तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवणार…” अशी बोचरी टीका मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केली.
रोखठोकमध्ये नेमकं काय म्हटलं?
“एखादी राजकीय, शासकीय, प्रशासकीय यंत्रणा पाठीशी असल्याशिवाय सोनू सूद हे सर्व करू शकेल काय ? “कुणाला मुंबईतून उत्तर प्रदेशात जायचे असेल तर आपल्या मोबाईल नंबरसह एक मेसेज करा. सोनू सूद तुम्हाला घरी पोहोचवेल” असा प्रचार ठरवून झाला. त्या प्रचारासाठी मोठी राजकीय यंत्रणा कामाला लावली गेली. सरकार मजुरांसाठी काम करत नाही. पण सोनू सूद करतोय हे बिंबवण्याचा प्रयत्न झाला.” अशी टीका ‘सामना’तून झाली.
वाचा सविस्तर : सोनू सूदला पुढे करुन ‘ठाकरे’ सरकारला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न, ‘सामना’तून सोनूच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह
संबंधित बातम्या :
सोनू सूदच्या कामाने रोहित पवार भारावले, घरी जाऊन कौतुकाची थाप
(Sonu Sood meets CM Uddhav Thackeray Minister Aditya Thackeray at Matoshree)