शिवसेनेला केंद्रात 3 मंत्रीपदे, या तीन खासदारांच्या नावावर शिक्कामोर्तब?

मुंबई : केंद्रीय मंत्रीमंडळात शिवसेनेच्या वाट्याला तीन मंत्रीपदं येणार असल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात शिवसेनेला एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रीपदं दिली जाऊ शकतात. 30 मे रोजी नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळीच सर्व मंत्र्यांचाही शपथविधी होणार आहे. राज्यात शिवसेनेकडून बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, राज्यसभेचे खासदार अनिल देसाई आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार […]

शिवसेनेला केंद्रात 3 मंत्रीपदे, या तीन खासदारांच्या नावावर शिक्कामोर्तब?
Follow us
| Updated on: May 28, 2019 | 4:38 PM

मुंबई : केंद्रीय मंत्रीमंडळात शिवसेनेच्या वाट्याला तीन मंत्रीपदं येणार असल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात शिवसेनेला एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रीपदं दिली जाऊ शकतात. 30 मे रोजी नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळीच सर्व मंत्र्यांचाही शपथविधी होणार आहे.

राज्यात शिवसेनेकडून बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, राज्यसभेचे खासदार अनिल देसाई आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्या नावाची चर्चा आहे. शिवसेनेला ही तीन मंत्रीपदं मिळाल्यानंतर या तीन खासदारांच्या नावावर पक्षाकडून शिक्कामोर्तब केलं जाऊ शकतं. शपथविधीसाठी अवघे दोन दिवस उरले असल्याने कुणाला कोणतं मंत्रीपद मिळणार याकडे लक्ष लागलंय.

पंतप्रधान मोदी 30 मे रोजी सायंकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनात शपथ घेतील. त्यांच्यासोबतच मंत्रीमंडळाचाही शपथविधी असेल. सध्या सोशल मीडियावर मंत्रीपदाची यादीच फिरत आहे. पण अजून अधिकृतपणे कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब केलेलं नाही. मीडियात मंत्रीपदाविषयी चर्चा होत राहितील, पण त्यावर दुर्लक्ष करावं, असं आवाहन मोदींनी नवनिर्वाचित खासदारांनी पहिल्याच संबोधनात केलं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला BIMSTEC देशांच्या प्रमुखांसह आठ देशांच्या प्रमुखांना निमंत्रण देण्यात आलंय. बिम्सटेकमध्ये भारतासह दक्षिण आशियातील आणि पूर्व आशियातील बंगालच्या खाडीशी संबंधित सात देश आहेत. यामध्ये बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, नेपाळ आणि भूटानचा समावेश आहे. याव्यतिरिक्त किर्गिस्तानचे राष्ट्रपती आणि मॉरिशिअसच्या पंतप्रधानांनाही निमंत्रण देण्यात आलंय.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.