Mumbai South Lok sabha result 2019 : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ निकाल

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ :दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवेसेनेच्या अरविंद सावंत यांनी पुन्हा एकदा बाजी मारली. त्यांनी काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांचा पराभव केला. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. दक्षिण मुंबईत शिवसेनेकडून अरविंद सावंत विरुद्ध काँग्रेसकडून मिलिंद देवरा अशी लढत पाहायला मिळाली. दक्षिण मुंबई हा उच्चभ्रू परिसर आहे.  यामध्ये वरळी, मलबार हिलसह […]

Mumbai South Lok sabha result 2019 : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ निकाल
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ :दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवेसेनेच्या अरविंद सावंत यांनी पुन्हा एकदा बाजी मारली. त्यांनी काँग्रेसच्या मिलिंद देवरा यांचा पराभव केला. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. दक्षिण मुंबईत शिवसेनेकडून अरविंद सावंत विरुद्ध काँग्रेसकडून मिलिंद देवरा अशी लढत पाहायला मिळाली. दक्षिण मुंबई हा उच्चभ्रू परिसर आहे.  यामध्ये वरळी, मलबार हिलसह 6 विधानसभांचा समावेश आहे. वरळी, शिवडीमध्ये शिवसेना, मलाबार हिल, कुलाबामध्ये भाजप, मुंबादेवीमधून काँग्रेस तर भायखळामधून असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाचा आमदार आहे.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनाराहुल शेवाळे (शिवसेना)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीएकनाथ गायकवाड (काँग्रेस)पराभूत
अपक्ष/इतरडॉ. संजय भोसले (VBA)पराभूत

दक्षिण मुंबई हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता. मिलिंद देवरा सलग दोन वेळा 2004 आणि 2009  मध्ये निवडून आले. मात्र 2014 च्या निवडणुकीत त्यांचा पराभव करुन शिवसेनेचे अरविंद सावंत खासदार झाले.

यंदा काँग्रेसने पुन्हा मिलिंद देवरा तरशिवसेनेने अरविंद सावंत यांनाच उमेदवारी दिली. वंचित बहुजन आघाडीने दक्षिण मुंबईत डॉ. अनिल कुमार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. मात्र खरी लढत ही मिलिंद देवरा आणि अरविंद सावंत यांच्यातच झाली.

या जागेवर 1952 पासून 1967 पर्यंत काँग्रेसचं वर्चस्व होतं. मात्र 1967 मध्ये जॉर्ज फर्नांडिस यांनी जनता दलतर्फे लढून हा मतदारसंघ काँग्रेसकडून खेचून आणला होता. त्यानंतर इथे बदल होत गेले. 1984 पासून 1996 पर्यंत इथे काँग्रेसच्या मुरली देवरा यांचं वर्चस्व होतं. मग 1996 मध्ये भाजपच्या जयवंतीबेन इथे निवडून आल्या. मात्र 1998 मध्ये मुरली देवरा विजयी झाले. मग 1999 मध्ये पुन्हा जयवंतीबेन मेहतांनी विजय मिळवला. 2004 मध्ये मुरली देवरा यांचे पुत्र मिलिंद देवरा काँग्रेसच्या तिकीटावर लढले आणि 2014 पर्यंत ही जागा काँग्रेसकडे राहिली.  मात्र 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत मिलिंद देवरा यांचा पराभव झाला आणि शिवसेनेचे अरविंद सावंत लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले. अरविंद सावंत यांनी सुमारे सव्वा लाखांपेक्षा जास्त मतांनी मिलिंद देवरांचा पराभव केला.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.