Special Story : राज्यात ग्रामपंचायत निवडणुका झाल्या, पण बिघडलेल्या संबंधांचं काय होणार?

ग्रामपंचायत निवडणुकीच्या या सर्व गदारोळात गावांमधील वातावरणही चांगलंच तापलं. काही ठिकाणी किरोकोळ वाद झाले, तर काही ठिकाणी निवडणुकीचे हे वाद अगदी विकोपालाही गेल्याचे पाहायला मिळाले.

Special Story : राज्यात ग्रामपंचायत निवडणुका झाल्या, पण बिघडलेल्या संबंधांचं काय होणार?
Follow us
| Updated on: Jan 16, 2021 | 6:47 PM

मुंबई : नुकत्याच राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. यात काही प्रमाणात ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्या, मात्र अनेक ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये चुरशीची लढत झाली. काही ठिकाणी एका गावात दोन पॅनल तर काही गावांमध्ये पॅनलसोबतच अपक्षांनीही शड्डू ठोकला आणि प्रचाराची राळ उठवली. मात्र, या सर्व गदारोळात गावातील वातावरणही चांगलंच तापलं. काही ठिकाणी किरोकोळ वाद झाले, तर काही ठिकाणी निवडणुकीचे हे वाद अगदी विकोपालाही गेल्याचे पाहायला मिळाले. हे विकोपाला गेलेले सामाजिक संबंध इतके बिघडले की पुढील 5 वर्षातही याच ताणलेल्या संबंधांवर गावगाडा चालणार का? असाच प्रश्न उपस्थित होतोय. याचाच घेतलेला हा खास आढावा (Special Report on Grampanchayat Election and effect on Social relations).

ग्रामपंचायत निवडणुका इतर कोणत्याही निवडणुकींपेक्षा वेगळ्या ठरतात कारण या निवडणुकीत इतरवेळी सोबत असणारेच निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांविरोधात उभे राहतात. मग सुरु होते रस्सीखेच, हेवेदावे आणि मग खुन्नस. राज्यात अनेक गावांमध्ये या प्रकराचं राजकारण पाहायला मिळालं. या निवडणुकीच्या वादातून काही ठिकाणी तर गुन्हेही नोंदवले गेले. याचंच एक उदाहरण नांदेडमध्ये पाहायला मिळालं. नांदेडमध्ये तर ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून दोन गावांमध्येच तुफान हाणामारी झाली.

बिलोली तालुक्यातील मुतन्याळ आणि लोहा तालुक्यातील जानापुरी गावात ही हाणामारी झाली. दोन्ही गावातील हाणामारीत जवळपास 50 जण जखमी झाले. यानंतर दोन्ही गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. असं असलं तरी नेमकं हे का होतं असाही प्रश्न उपस्थित होतोय. ग्रामपंचायत निवडणुकीत हे सर्व होण्यामागील कारणं आणि त्याचा भविष्यावर होणारा परिणाम याविषयी अनेक जाणकरांची मतं वेगवेगळी आहेत.

मागील अनेक वर्षांपासून पंचायत राज व्यवस्थेत महिलांची भागीदारी वाढावी आणि त्यात महिलांना कामाची संधी मिळून त्यांचं नेतृत्व विकसित व्हावं यासाठी काम करणाऱ्या महिला राजसत्ताक आंदोलनाचे प्रमुख भीम रासकर यांनी देखील नुकत्याच झालेल्या निवडणुकांविषयी महत्वाची निरिक्षणं नोंदवली. भीम रासकर म्हणाले, “कोरोना काळातही ग्रामपंचायत निवडणुकीत 79 टक्के मतदान झालं ही खूप चांगली गोष्टी आहे. विशेष म्हणजे यावेळच्या निवडणुकीत शिक्षित तरुण मुलं आणि मुली देखील मोठ्या प्रमाणात निवडणुका लढले. तरुणांचा निवडणुकीतील हा सहभाग महत्त्वाचा आहे. राज्यात बिनविरोध निवडणुकांचंही वारं आहे. मात्र, या निवडणुका खरंच किती बिनविरोध होतात हा प्रश्न आहे. अनेक ठिकाणी बिनविरोध निवडणुका होण्यासाठी हुकुमशाही पद्धतीने काम केलं जातं. त्यामुळे अशा बिनविरोध निवडणुका लोकशाहीला घातकच आहेत.”

“निवडणुका खेळीमेळीत होण्यासाठी ‘भ्रमदान’ मुक्ती गरजेची”

भीम रासकर यांनी निवडणुका खेळीमेळीच्या वातावरणात आणि संबंध खराब न होता होण्यासाठी ‘भ्रमदान’ मुक्त निवडणुकांचा पर्याय सुचवला. ते म्हणाले, “निवडणुकांमध्ये भांडणं आणि ताणतणाव टाळायचे असतील तर या निवडणुका भ्रमदान मुक्त झाल्या पाहिजेत. भ्रमदान म्हणजे भ्रष्टाचार, मटण, दारु, नवस यांच्यापासून मुक्त निवडणुका. अनेक ठिकाणी मतदारांना गंडे बांधले जाता, शपथा घ्यायला लावल्या जातात आणि मतदारांना कोणत्याही दबावाशिवाय मतदान करण्यात अडथळा केला जातो. हे टाळलं तर मतदान शांततेत होईल. आपणज जातीअंताविषयी बोलतो, मात्र निवडणुका आल्या की जात पुन्हा पुढे येते. त्यावरही काम करावं लागेल. निवडणुका लोकशाहीचा मुख्य भाग आहे. त्यामुळे त्यात होणारे ताणतणाव कमी करण्यासाठी मतदारजागृती करणं हाच उपाय आहे.”

“या ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांच्या याद्या योग्य पद्धतीने तयार केल्या नसल्याच्याही तक्रारी आहेत. मृत लोकांची, बाहेरच्या लोकांची नावं या याद्यांमध्ये होती आणि ज्यांची असायला हवी त्यांची नावंच नसल्याच्या तक्रारी आल्यात. यामुळे लोकांची बरिच धावपळही पाहायला मिळाली. वार्डमधील मतदारांच्या याद्या बदलल्याचंही दिसून आलं. असं असलं तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या निवडणुकांमध्ये आशा वर्कर आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी चांगले प्रयत्न केले,” असंही भीम रासकर यांनी नमूद केलं.

हेरंब कुलकर्णी म्हणाले, “ग्रामपंचायतमध्ये शासकीय पैसा येऊ लागल्याने ग्रामपंचायत निवडणुकीतील स्पर्धा निकोप राहिलेली नाही. राजकीय पक्ष याकडे लक्ष घालू लागल्याने स्थानिक स्तरावरील संघर्ष वाढलाय. त्यातच दारूचा वापर होऊन तरुण मुले दारु आणि इतर अमिषाचे बळी ठरलेत. त्यामुळे तणाव खूप वाढतोय. त्यावर उपाय म्हणून याकाळात दारूवर कठोर नियंत्रण ठेवणे आणि निवडणूक काळात गावातील ज्येष्ठ व्यक्तींची, महिलांची समिती नेमणे गरजेचे आहे.”

हेही वाचा :

महाराष्ट्रातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी मतदान, अडीच लाखांहून अधिक उमेदवारांचं भवितव्य मतदानयंत्रात बंद

महाराष्ट्र ग्रामपंचायत मतदान 2021: गुलाबराव पाटलांच्या गावात ‘शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना’, शिवसैनिक स्वकियांविरोधात मैदानात

महाराष्ट्र ग्रामपंचायत मतदान 2021: दौंड तालुक्यातील कुसेगावात बाचाबाची, पोलिसांकडून लाठीचार्ज

व्हिडीओ पाहा :

Special Report on Grampanchayat Election and effect on Social relations

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.