स्पेशल रिपोर्ट : एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने उत्तर महाराष्ट्रातील राजकारण कसं बदलणार?

एकनाथ खडसे यांच्या निमित्ताने उत्तर महाराष्ट्रात भाजपला खिंडार पाडणे हा राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन असल्याचे बोलले जात आहे.

स्पेशल रिपोर्ट : एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने उत्तर महाराष्ट्रातील राजकारण कसं बदलणार?
Follow us
| Updated on: Oct 23, 2020 | 6:43 PM

नाशिक : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती बदलणार आहे. तब्बल चाळीस वर्ष भारतीय जनता पक्ष ग्रामीण भागातल्या तळागाळात पोहोचवण्यात नाथाभाऊंचा कसब पणाला लागला. नाथा भाऊंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी उत्तर महाराष्ट्र काबीज करण्याचा मास्टर प्लॅन तयार केला आहे. याशिवाय आपल्या नेहमीच्या शैली एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा हा प्रयोग असल्याचं राजकीय तज्ञांचे मत आहे. (Special Report on How Politics of North Maharashtra will change after Eknath Khadse joins NCP)

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या प्रवेशाने उत्तर महाराष्ट्रातला राजकारण ढवळून निघणार आहे. उत्तर महाराष्ट्रातल्या सद्यस्थितीच्या राजकीय बलाबलाचा विचार केला तर भाजपचा दबदबा उत्तर महाराष्ट्रावर स्पष्टपणे दिसून येतो. यामुळेच नाथाभाऊंच्या निमित्ताने उत्तर महाराष्ट्रात भाजपला खिंडार पाडणे हा राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन असल्याचे बोलले जात आहे. नाथाभाऊंच्या निमित्ताने पक्षाला उत्तर महाराष्ट्रात एक बहुजन चेहराही मिळाला असून यानिमित्ताने उत्तर महाराष्ट्रातील एकमेव चेहरा असलेल्या छगन भुजबळ यांनादेखील चेक देण्याचा पवारांचा प्रयत्न असल्याचं अभ्यासकांचं मत आहे.

छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या माध्यमातून उभी केलेली संघटनेच्या माध्यमातून भुजबळ दबाव तयार करतात असे नेहमीच त्यांच्यावर आरोप झालंय तसेच विधानसभा निवडणूकपूर्वी शिवसेना प्रवेशामुळे वरिष्ठांची असलेली नाराजी यामुळे भुजबळ समोर एक तगडा बहुजन चेहरा पक्ष गेल्या काही वर्षांपासून शोधतच होता अस देखील काहीजणांच्या मत आहे… आता नाथाभाऊ राष्ट्रवादीच्या गळाला लागल्यानंतर पक्षाची ताकद वाढणार हे निश्चित आहे

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे एक मोठी ताकद भाजपची उत्तर महाराष्ट्रात आहे. एकनाथ खडसे हे भाजपचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यामुळे ते आता राष्ट्रवादीमध्ये गेल्याने पक्षाचं फार काही नुकसान होणार नाही, असे म्हणत एकनाथ खडसे हे मोठे नेते असल्याच कबुली देखील स्थानिक भाजप नेत्यांनी दिली आहे. (Special Report on How Politics of North Maharashtra will change after Eknath Khadse joins NCP)

उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर धुळे, नंदुरबार, अहमदनगर आणि खुद्द जळगाव याठिकाणी भाजपला चारीमुंड्या चित करण्यासाठी आणि राष्ट्रवादीचा दबदबा वाढवण्यासाठी आता नाथाभाऊ कार्ड वापरले जाणार हे निश्चित. मात्र नाथाभाऊंच्या निमित्ताने एका दगडाने पुन्हा एकदा चार पक्षी मारण्याचा डाव पवारांनी चालला हे निश्चित.

संबंधित बातम्या :

दिल्लीतल्या वरिष्ठांनी सांगितलं तुम्हाला पक्षात संधी नाही, तुम्ही राष्ट्रवादीत जा; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

एकनाथ खडसे यांच्यासह 72 नेते राष्ट्रवादीत, कोणाकोणाचा पक्षप्रवेश?

(Special Report on How Politics of North Maharashtra will change after Eknath Khadse joins NCP)

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.