साताऱ्यात नवा कलह, भाजप कार्यकर्त्यांची शिवेंद्रराजे हटावची घोषणा
सातारा विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांपासून भाजपच्या माध्यमातून झुंजणाऱ्या काही कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातूनच "शिवेंद्रसिंहराजे (Shivendra Raje Bhosale BJP) हटाव, भाजप बचाव' ही भूमिका घेत सातारा विधासभा मतदारसंघातील भाजपचे बूथप्रमुख आणि विविध पदाधिकाऱ्यांचा साताऱ्यात मेळावा पार पडला.
सातारा : राष्ट्रवादीतून भाजपात आलेले शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale BJP) यांच्यामुळे स्थानिक पातळीवर नवा वाद निर्माण झालाय. सातारा विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांपासून भाजपच्या माध्यमातून झुंजणाऱ्या काही कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातूनच “शिवेंद्रसिंहराजे (Shivendra Raje Bhosale BJP) हटाव, भाजप बचाव’ ही भूमिका घेत सातारा विधासभा मतदारसंघातील भाजपचे बूथप्रमुख आणि विविध पदाधिकाऱ्यांचा साताऱ्यात मेळावा पार पडला.
शिवेंद्रराजे भोसले यांना भाजपाचं तिकीट दिलं तर भाजपाचा झेंडा हातात घेऊन त्यांना पाडण्याचं काम करु, असा इशारा पक्षश्रेष्ठींना भाजपा बूथ प्रमुखांनी दिला. त्यामुळे येत्या विधानसभेचं तिकीट दिपक पवार यांना द्यायचं की शिवेंद्रराजे यांना हा पेच पक्षासमोर निर्माण झालाय. पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्ष दिपक पवार यांनी शिवेंद्रराजेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी भाजपात प्रवेश करतोय असं जाहीरपणे सांगत शिवेंद्रराजेंनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला होता. गेल्या पाच वर्षात मी विरोधी पक्षात असल्यामुळे माझ्या मतदारसंघातील प्रश्नांना न्याय मिळाला नाही. लोकसभेच्या निवडणुकीनंतर काँग्रेसचं सरकार येईल अशी परिस्थिती राहिलेली नाही ही वस्तूस्थिती आहे. अजून पाच वर्ष विरोधात राहून माझ्या मतदारसंघाचं नुकसान करायचं हे मला लोकप्रतिनिधी म्हणून पटत नाही, असंही त्यांनी सांगितलं होतं.
VIDEO :